विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून संधी दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे आंबेगाव तालुक्याचे गेल्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करणारे आमदार दिलीप वळसे पाटील यांनीही आपली मुलगी पूर्वा वळसे पाटील हिला आमदारकीसाठी उतरवण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपूर्ण राजकीय परिस्थितीचे चित्र येणारा काळच ठरवेल.
पार्थ पवार यांना गेल्या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून संधी देण्यात आली होती. मात्र तिथे झालेल्या पराभवाचा विचार करता पार्थ पवार यांना आणखी काम करण्याची गरज असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनेक राजकीय नाट्य देखील त्यावेळी घडले होते. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व येथे सिद्ध केले होते. मात्र आता राजकीय वातावरण पूर्ण बदलले आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवरील राजकारणही फिरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अनेक वर्षांपासून आपल्या मतदारसंघात तळ ठोकून असलेल्या राजकीय नेत्यांना आणि आपल्या मुलांच्या लॉन्चिंग करण्यात कितपत यश मिळेल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व करत आहेत. आंबेगाव तालुका म्हटलं तर वळसे पाटील असे समीकरणच आहे. त्यात वळसे पाटील म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अंत्यत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन आमदारकीवर निवडून आणणे तसे फारसे अवघड नाही. पण राजकारणात काहीही होऊ शकतं. येणाऱ्या काळात पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षातील मोठे पद देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
Pune: बारामतीमधील बॅनरची राज्यभर चर्चा, … उमेदवाराचा अपमान करण्यात येईल
इकडे शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदारकीसाठी इच्छुक आहेत. मात्र राज्यात भाजप-शिंदेंचे सरकार आहे. त्यातच भाजपने देखील या मतदारसंघात आपली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपकडून देखील खासदारकीची उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या मदतीने या मंतदारसंघात फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवीन चेहेऱ्याना संधी दिली जाईल की जुन्याच खेळाडूंना पक्ष पुन्हा पटलावर घेणार? हे आता येणारा आगामी काळत स्पष्ट होईल.
पुणे महापालिकेचे विभाजन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय, उरळी-