गुजरातसाठी उद्योग पळवले, कर्नाटकसाठी महाराष्ट्राची गावं तोडतील, उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई: विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी मविआची बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, छगन भुजबळ, रईस शेख, कपिल पाटील, डाव्या पक्षांचे नेते आणि महाविकस आघाडीचे नेते पत्रकार परिषदेला उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कर्नाटकच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गावं तोडण्यास मागं पुढं पाहणार नाहीत, असं ठाकरे म्हणाले.

मुंबई देखील तोडण्याचा डाव

आजच्या बैठकीचा हेतू अजित पवार यांनी सांगितला. परवाची बैठक धावपळीत झाली, मोजकेच लोकं उपस्थित होते, आज मविआचे सर्व घटक पक्ष उपस्थित आहेत. १७ तारखेला महाराष्ट्रद्रोही लोकांच्या विरोधात महामोर्चा जिजामाता भोसले उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा होईल. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील सीमाभागातील गावांवर दुसऱ्या राज्यांकडून दावा केला जात आहे. मुंबई देखील तोडण्याचा डाव केला जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

दिल्लीमध्ये आप, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस जिकंल, गुजरातमध्ये भाजपनं अभूतपूर्व यश मिळवलं आहे. विजयाचे मानकरी आहेत त्याचं अभिनंदन करत आहोत. पण, महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांच्या प्रकल्पांचं योगदान आहे. कर्नाटकच्या निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्रातील गावं तोडण्यास पुढं मागं बघणार नाहीत त्यांना इशारा देत आहोत. महाराष्ट्र प्रेमी आहेत त्यांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहोत. मोर्चा प्रचंड होणार आहे, महाराष्ट्र प्रेम हा एकत्र धागा ठेऊन आम्ही सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सीमाभाग म्हणतो त्याला कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र म्हणलं पाहिजे. तिथल्या लोकांनी लोकशाही मार्गानं महाराष्ट्रात जाण्यासाठी आंदोलन केलं होतं. तिथल्या मराठी नागरिकांना अटक केली जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना, मंत्र्यांना तिकडे जाण्यास बंदी का घातली जात आहे. केंद्रात, महाराष्ट्रात, कर्नाटकात तिन्ही पक्षाचं सरकार असल्यानं हा प्रश्न सोडवण्यासारखी चांगली स्थिती पुन्हा येणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतात तर महाराष्ट्राचे का बोलत नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशने कर्णधार बदलला, पाहा कसोटी संघात कोणाला संधी

महाराष्ट्रानं संयम पाळायचा का? महाविकास आघाडीच्या खासदारांनी विषय मांडला आहे. बाकीच्या खासदारांनी तोंडात बोळे घातले आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील सीमाभागाबाबत मुख्यमंत्री नवस करायला गुवाहाटीला का जात नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

असे काय झाले की हिमाचल प्रदेशात भाजपचा पराभव झाला?; हे महत्त्वाचे मुद्दे ठरले निर्णायक

देवेंद्र फडणवीसांनी टोमण्यांसदर्भात केलेल्या वक्तव्यांवर ठाकरेंनी उत्तर दिलं. आम्ही घेतलेल्या आक्षेपांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तरं नाहीत, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी केला. चांगले प्रकल्प तुमच्या राज्यात, वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राकडे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी लगावला.

सहा महिन्यांपूर्वी कारभार हाती, भाजपच्या CM ना पाणी पाजलं, प्रतिभा सिंह यांनी करुन दाखवलं!

Source link

ajit pawarcongress newsMaharashtra newsMarathi Breaking Newsmva newsNana PatoleUddhav ThackerayUddhav Thackeray news
Comments (0)
Add Comment