जळगाव जिल्हा संपादक :- शैलेश चौधरी
एरंडोल : येथील पोलिस ठाण्याचे कर्मचारी संदीप अशोक सातपुते,अमित राजू तडवी,नयना हरीदास वडनेरे,संदीप भास्कर पाटील व मिलिंद भारत कुमावत या पोलिस शिपायांना सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस नाईक पदावर बढती मिळाली आहे. त्यांना मिळालेल्या बढतीबद्दल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे,पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे,पोलिस नाईक अनिल पाटील व सुनिल लोहार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.पोलिस नाईक ते पोलिस हवालदार व पोलिस शिपाई ते पोलिस नाईक या पदी जिल्ह्यातील एकूण १२० जणांची बढती झाल्याचे आदेश १९जुलै२०२१ रोजी जळगाव पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी काढले होते.