हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. त्यात शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयातील माजी विद्यार्थी जनकराज पखरेतिया भरमौर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. ते आमदार झाल्यानं त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील वर्गमित्रांना विशेष आनंद झाला आहे.
वादानंतर मला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला आणि…; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले
हिमाचल प्रदेशातील रहिवासी जनकराज पखरेतिया यांनी १९९५-९७ यावर्षी शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात नववी व दहावीचे शिक्षण घेतले होते. त्यांचे पुढील शिक्षण सरोल (जि.चंबा हिमाचल प्रदेश) येथील नवोदय विद्यालयात झाले. वैद्यकीय शिक्षण घेऊन इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज शिमला येथे न्युरोसर्जरी वरिष्ठ प्रोफेसर म्हणून सेवा देत असतानाच राजकीय क्षेत्राकडे वळलेल्या डॉ. जनकराज यांनी तीन महिन्यांपूर्वी सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भरमौर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली.
पुण्यात रेल्वेच्या स्लीपर कोचला आग लागली अन् अधिकाऱ्यांची धावपळ; पण नंतर वेगळीच माहिती समोर
काँगेसचे उमेदवार ठाकूर सिंह भरमोरी यांना ४,६०० मतांनी हरवून ते विजयी झाले. डॉ. जनकराज पखरेतिया यांचे मित्र बुलढाणा जिल्ह्यातील अतुल बोंद्रे, गणेश पवार, प्रमोद लहाळे, शंकर शिंदे, विजय सरकटे, दीपक कांबळे, गजानन राऊत, संदिपान कराटे आदी विविध क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर आहेत. आपला मित्र हिमाचलमध्ये आमदार झाल्यामुळे या सर्वांच्याच आनंदाला उधाण आले आहे.
नेमारच्या गोलनंतरही ब्राझीलचा संघ FIFA world cup च्या बाहेर, क्रोएशिया उपांत्य फेरीत दाखल