‘लव्ह जिहाद’च्या कायद्यासाठी अभ्यास सुरू, देवेंद्र फडणवीसांची माहिती

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’चा कायदा आणायचा की नाही याबाबत अद्याप आमचा निर्णय झालेला नाही. आम्ही पडताळणी करीत आहोत. वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे केले याचा अभ्यास करीत आहोत’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि काही नियोजित कार्यक्रमांच्या निमित्ताने फडणवीस शुक्रवारी नागपुरात आले होते. विमानतळावर पत्रकारांनी त्यांना ‘लव्ह जिहाद’बाबत छेडले. येत्या हिवाळी अधिवेशनात आपण ‘लव्ह जिहाद’ संदर्भात कायदा आणणार आहात का? असा प्रश्न केला असता, त्यांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगतानाच, पडताळणी आणि अभ्यास सुरू असल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट ही चांगली गोष्ट आहे. ‘राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन ते भेटले असतील तर चांगलेच आहे.’ असे फडणवीस म्हणाले. या भेटीचे निमंत्रण देऊनही शिंदे गटाचे खासदार गेले नव्हते, असे निदर्शनास आणून दिले असता, ‘ शिंदे गटाचे खासदार त्यांना नेहमीच भेटत असतात’ असे उत्तर त्यांनी दिले.

मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट’चा मार्ग मोकळा; खारफुटीच्या सुमारे २२ हजार झुडपांची होणार कत्तल
आघाडीने रखडविले नागपूरचे प्रकल्प

‘नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणि मेट्रो टप्पा दोन या दोन्ही प्रकल्पांचे प्रस्ताव आम्ही २०१९पूर्वी केंद्राकडे पाठविले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. या प्रकल्पाच्या बाबतीत केंद्र सरकारने काढलेल्या छोट्या-छोट्या त्रुटींची पूर्तता आघाडी सरकारने दोन अडीच वर्षे केली नाही. त्यामुळे हे प्रकल्प रखडले होते. आम्ही त्रुटी दूर केल्यानंतर अवघ्या २७ दिवसात केंद्राने त्यांना मंजुरी दिली. या दोन्ही प्रकल्पाने नागपूरच्या विकासाला गती मिळेल. गेम चेंजर ठरणारा समृद्धी, नाग नदी, मेट्रो या तिन्ही प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हा ऐतिहासिक दिवस येतो आहे, असे फडणवीस म्हणाले.

Source link

devendra fadnavis batmya marathidevendra fadnavis batmya todayDevendra Fadnavis News Todaylove jihad in maharashtralove jihad lawlove jihad law in indiaदेवेंद्र फडणवीस बातम्यालव्ह जिहाद महाराष्ट्र
Comments (0)
Add Comment