धनंजय मुंडेंच्या ऑफिसमधून बोलतोय, पैसे पाठवा; मेट्रोशी संबंधित अधिकाऱ्याला धमकीचा फोन

पिंपरी : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामधून बोलत असल्याचं सांगत पिंपरी परिसरात चिखली या ठिकाणी असलेल्या मेट्रोच्या व्यवस्थापकाला धमकीचा फोन आला. शिवीगाळ आणि दमबाजी करत संबंधिताकडे पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शुक्रवारी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत शिवदास साधू चिलवंत (वय ४१ वर्ष, रा. घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या नावाचा गैरवापर करत कोणीतरी धमकावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या खासगी एजन्सीमध्ये शिवदास चिलवंत हे व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. यावेळी त्यांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचं सांगणारा फोन आला. मी धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत आहे. तू मूळचा उस्मानाबाद येथील राहणारा आहेस. त्यामुळे शिवाजीनगर येथे धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे, असे म्हणत फोनवरुन त्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करण्यात आली.

हेही वाचा : भडका शमणार? सीमावादाबाबत अमित शहांची बुधवारी शिंदे, बोम्मई यांच्याशी चर्चा

या घटनेने चिखली परिसरात एकच खळबळ उडाली होती. हा फोन नक्की कुठून आला आणि तो खरा आहे की नाही याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेबाबत धनंजय मुंडे यांच्या ऑफिसकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रासाठी सीमावर्ती गावातील स्थिती ही भूषणावह नाही!, रामदास आठवलेंचा मविआवर हल्लाबोल

Source link

dhananjay mundedhananjay munde office ransom callMaharashtra Political Newspimpri chinchwad newspune metro managerधनंजय मुंडेधनंजय मुंडे कार्यालय धमकीचा फोनपिंपरी चिंचवड बातम्यापुणे मेट्रो मॅनेजर खंडणी कॉल
Comments (0)
Add Comment