आर्थिक अडचण आता दूर होणार; शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता इतकी रक्कम

हिंगोली: सध्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे शेतात वाढीव उत्पादन घेणे सोयीचे झाले आहे. परंतु विविध उत्पादन किंवा फळ लागवड असेल किंवा इतर कोणतेही पीक असो, यासाठी आवश्यक असते ते मुबलक प्रमाणावर पाणी. जे सध्या मोजक्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. साधारणत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतकेच पाणी बहुतांश शेतकऱ्याकडे शिल्लक असते. परंतु कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवायचा असेल तर त्यासाठी पाणी संग्रहित करणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी उत्तम पर्याय म्हणून शेतकरी शेततळे, पन्नी तलाव याला पसंती असतात.

मागेल त्याला शेततळे ही शासनाची योजना अनेक वर्षे चालली. या योजनेचा असंख्य शेतकऱ्यांनी लाभ सुद्धा घेतला. परंतु काही शेतकऱ्यांना शासनाच्या अपुऱ्या अनुदानाअभावी शेततळ्याची स्वप्न पूर्ण करता आले नाही. परंतु आता शेततळ्यासाठी अनुदान रकमेची वाढ करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झालाय.

कृषी विभागातर्फे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला आहे. शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत ५० टक्क्यांनी वाढ करून ते ७५ हजार रुपये केल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. शासनाने शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत ५० टक्क्यांनी वाढ करत ७५ हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तालुका निहाय उद्दिष्ट दिले आहे. ऑनलाइन सोडतीद्वारे लाभार्थ्याची निवड करून योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर योजनेअंतर्गत असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

वाचाः करोना आणि गोवरनंतर आणखी एका आजाराने वाढवले महाराष्ट्राचे टेन्शन, राज्यातील दुर्गम भागात…

शेतकऱ्यांनी अशी करावी नोंदणी

शेतकऱ्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावर शेतकरी पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःचा मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबलेट सामुदायिक सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता येईल. अर्जदारांनी प्रथम वापरकर्त्याचे नाव व संकेत शब्दाचा वापर करून घ्यावा. व आपले खाते उघडावे त्यानंतर पुन्हा लॉगिन करावे. अर्जदारांना वैयक्तिक शेततळे या घटकासाठी वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यासाठीचा पर्याय उपलब्ध असेल.अर्जदारांनी त्यांच्या इच्छेनुसार निवडलेल्या पर्यायानंतर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास सविस्तर माहिती मेल द्वारे पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे.

वाचाः अंगावर वाघासारखे पट्टे, डौलदार चाल; भावासारख्या मित्राला दोस्तांनी गिफ्ट केला रेडा, कारण काय?

या योजनेसाठी काही अटी सुद्धा देण्यात आले आहेत. स्वतः लाभार्थ्याच्या नावावर किमान ०.६ एकतर क्षेत्र व शेततळे खोदण्यास जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे.अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागील त्याला शेततळे सामूहिक शेततळे अथवा कुठल्याही योजनेतून शेततळे या घटकांसाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

वाचाः मंदौस चक्रीवादळ धडकणार; ३ राज्यांना रेड अलर्ट, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट

Source link

maharashtra governmentmaharashtra government to farmersमहाराष्ट्र सरकारशेतकरी योजनाशेतकऱ्यांसाठी योजना
Comments (0)
Add Comment