मी आणि राज ठाकरे वेगळे व्हायला तयार नाही, वसंत मोरेंनी बॅनर फाडून ‘निष्ठा’ दाखवली

पुणे : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी पुन्हा पुढे सरसावले आहेत. ऑफिसमधील जुने बॅनर फाटले, पण मी आणि राज ठाकरे वेगळे व्हायला तयार नाही, या प्रतिकात्मक कृत्यातून मोरेंनी आपली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मला पक्षातून बाहेर ढकलण्याचं काम केलं जातंय, पण माझी ताकद आजमवण्यापेक्षा पक्षासाठी ताकद लावा, अशा शब्दात वसंत मोरे यांनी बाबू वागस्करांना टोला लगावला.

वसंत मोरे यांनी काल रात्री साडेबारा वाजता एक व्हिडिओ ट्वीट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. याविषयी बोलताना मोरे म्हणाले, की मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासोबत काल माझी ३५ ते ४० मिनिटं चर्चा झाली. पक्षाच्या इतर नेत्यांनी माझ्यावर, माझ्या प्रसिद्धीवर, आणि माझ्या एकनिष्ठेवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. त्यामुळे मी व्यथित झालो होतो. मी ऑफिसला आलो, एका जुन्या कार्यक्रमासाठी वापरलेले माझे आणि राज ठाकरे यांचे कटआऊट बाहेर काढले, मात्र ते एकमेकांना इतके चिकटले होते, की ते विलग करता येत नव्हते, असं वसंत मोरेंनी सांगितलं

वसंत मोरे यांच्या ट्वीटमध्ये काय?

“मागच्या महिन्यात एका कार्यक्रमानंतर मांडव वाल्याने मा. राज साहेबांचे आणि माझे मांडवातले २ उभे बॅनर काढले आणि एकमेकांना समोरासमोर बांधले. आज दुपारी अमितसाहेबांना भेटून आल्यानंतर म्हटलं माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्यांना उत्तर द्यावे म्हणून ते बॅनर शोधून काढले आणि म्हटलं ते ऑफिसला लावून टाकावेत म्हणजे सर्वांना उत्तरे मिळतील. पुढे काय झाले ते तुम्हीच पहा …” असं कॅप्शन देत वसंत मोरेंनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

“खऱ्या अर्थाने कळेल वसंत मोरे आणि राज ठाकरेंचं नातं काय आहे ते.. आम्ही एवढा वेळ ताकद लावतोय, पण दोन्ही फोटो एकमेकांना इतके घट्ट चिकटलेत की निघायला तयार नाहीत. बॅनर फाटला, पण अजूनही वसंत मोरे आणि राज साहेब ठाकरे वेगळे व्हायला तयार नाहीत” असं मोरे या व्हिडिओ बोलताना दिसतं

Source link

babu vagaskarMaharashtra Political Newspune maharashtra navnirman senapune mns disputeraj thackerayVasant Moreपुणे मनसे नेते वादबाबू वागस्करराज ठाकरेवसंत मोरे
Comments (0)
Add Comment