बॉडी मसाज सर्च करताना ‘ती’ वेबसाईट उघडली, समोर बहिणीचा फोटो, खाली लिहिलेलं…

मुंबई : एस्कॉर्ट वेबसाईटवर आपलीच बहीण आणि ओळखीतील अन्य एका महिलेचे फोटो पाहून ३१ वर्षीय तरुणाला धक्काच बसला. मुंबईतील खार भागातील रहिवासी असलेल्या तरुणाने वेबसाईटवरुन एका महिलेचा मोबाईल क्रमांक शोधून काढला आणि तिला भेटायला बोलावले. त्यानंतर तरुण आणि त्याच्या नातेवाईकांनी बुधवारी महिलेला पकडून खार पोलिसांच्या ताब्यात दिले.

खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ डिसेंबर रोजी संबंधित तरुण ऑनलाइन डेटिंग आणि बॉडी मसाजबद्दल इंटरनेटवर सर्फिंग करत होता. यावेळी तो एका एस्कॉर्ट वेबसाईटवर येऊन धडकला. त्यातील काही अश्लील पोस्ट्ससह छायाचित्रं पाहून तो हबकून गेला.

त्यानंतर तक्रारदार तरुणाने आपल्या बहीण आणि अन्य महिलेकडे या फोटोंबद्दल विचारपूस केली. त्यावेळी, आपण फेसबुक प्रोफाइलवर सुमारे पाच वर्षांपूर्वी हे फोटो अपलोड केले होते, असं त्यांच्याकडून समजलं.

अधिक तपास करण्यासाठी फिर्यादीने पुन्हा वेबसाईटला भेट दिली असता त्याला दोन मोबाईल क्रमांक आढळले. यापैकी एका क्रमांकावर तक्रारदाराच्या बहिणीचा फोटो व्हॉट्सअॅप डीपी म्हणून ठेवला होता. ६ डिसेंबर रोजी त्या व्यक्तीने या क्रमांकावर संपर्क साधला असता एका महिलेने उत्तर दिले. त्यानंतर त्याने संबंधित महिलेला दुसऱ्या दिवशी खार येथे भेटण्यास सांगितले आणि तिनेही होकार दिला.

तक्रारदार तरुण आणि फोटोचा गैरवापर झालेल्या त्याच्या दोन महिला नातेवाईक खार येथील हॉटेलजवळ थांबले. काही वेळाने एक महिला घटनास्थळी आली. त्या महिलेने आपण वेबसाईट चालकाच्या वतीने आल्याचे तक्रारदाराला सांगितले. एस्कॉर्ट वेबसाइटवर आपल्या नातेवाईकांची छायाचित्रे का अपलोड केली? असं तक्रारदाराने त्या महिलेला विचारलं, तेव्हा तिने भररस्त्यातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : बँड सज्ज, लग्नाची जोरदार तयारी; पण लग्नाच्या बेडीआधी हाती पोलिसांची बेडी पडली; ‘वरात’ निघाली

त्यानंतर तक्रारदार आणि त्याच्या सोबत असलेल्या महिलांनी तिला पोलिस ठाण्यात आणले. बुधवारी तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ (फसवणूक करणे) आणि ५०० (बदनामी) आणि कलम ६६सी (आयडेंटिटी थेफ्ट), ६६डी (संगणक संसाधनाचा वापर करुन फसवणूक करणे), ६७ (अश्लील सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : कापड विकायला आला न् ड्रग्ज तस्कर झाला, पुण्यात तरुणाकडे २.१६ कोटींचं कोकेन

Source link

cyber crimeescort servicesmaharashtra crime newsMaharashtra news todaymumbai crimevulgar photos on websiteअश्लील वेबसाईटसायबर क्राईम
Comments (0)
Add Comment