विरोधी पक्ष नेते अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे शरद कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्लिक करा आणि वाचा- चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन; वाचा, टॉप १० न्यूज
पुढे बोलताना पवार म्हणाले की, देशातील बेरोजगारीचा दर ८.३% पर्यंत गेला आहे. निवडणुकीच्या वेळी नोकऱ्या उपलब्ध करून देतो, अशा वल्गना केल्या गेल्या, मात्र काही झालं नाही, निव्वळ भुलभुलैया, असं म्हणत जनतेने याबाबत विचार करावा, असे पवार म्हणाले. सीमा भागातील लोक शिंदे फडणीस सरकारवर विश्वास ठेवायला तयार नसल्याचे त्यांनी पुढे म्हटले.
क्लिक करा आणि वाचा- ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या नावाने पैसे वसुली, अभ्युदय वात्सल्यमच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
आम्ही चंद्रकांतदादांना भिकारड्या म्हटले तर…?- अजित पवार
या दौऱ्यादरम्यान त्यांनी महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दाही उपस्थित केला. भाजपचे अनेक वाचाळ वीर महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्दांचा वापर करत आहेत. याचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्याची गरज आहे आणि त्याचसाठी येत्या १७ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली; पिंपरी-चिंचवडमध्ये घडला प्रकार, तिघे ताब्यात, पाहा व्हिडिओ
ब ची भाषा आम्हालाही बोलता येते, मात्र आम्ही ती भाषा बोलणार नाही. कारण आमच्यावर चांगले संस्कार आहेत. आमची तशी संस्कृती नाही. पण भाजपमध्ये वाचाळवीरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकाचे झाले की दुसऱ्याचे सुरू होत आहे. आता आम्ही जर चंद्रकांतदादांना तू भिकारड्या सारखं बोलतोय असे म्हटले तर….? तर त्यांना काय वाटेल बरे?, मात्र आम्ही तसे बोलणार नाही, असेही पुढे अजित पवार म्हणाले.