यातील खबर देणारे रमेश यशवंत जाधव याचे मृत भाऊ रामचंद्र यशवंत जाधव ( ६७) यांचे वाकवली गावी श्रीकृष्णनगर येथे सर्वे नं ९१/६ या जागेत पेट्रोलपंप बांधण्याकरिता साफसफाईचे काम चालू होते. या पेट्रोल पंपाच्या टाकीचे खोदाईकाम जेसीबीच्या सहाय्याने सुरू होते. त्यावेळी रामचंद्र जाधव हे चर मारलेल्या जागेत उन असल्याने सावलीला चरात बसले होते.
क्लिक करा आणि वाचा- बोम्मई दावा करत सुटलेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प का आहेत?; अजित पवार कडाडले
त्यावेळी अचानक माती कोसळली. त्या मातीत रामचंद्र यशवंत जाधव हे गाडले गेले. ही दुर्घटना घडल्याबरोबर सगळ्यांची एकच धावपळ उडाली. तत्काळ तेथे बचावकार्य सुरू करण्यात आले. गाडले गेलेले रामचंद्र जाधव यांना फावड्याच्या सहाय्याने मातीतून बाहेर काढले गेले. मात्र त्यांना बाहेर काढल्यानंतर ते बेशुध्द अवस्थेत असल्याचे सर्वांना दिलले. त्यानंतर तातडीने त्यांना उपचाराकरीता दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांची प्राणज्योत मालवली होती.
क्लिक करा आणि वाचा- चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन; वाचा, टॉप १० न्यूज
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रामचंद्र यशवंत जाधव यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात खबर दाखल केली आहे. महिला पोलीस नाईक सुहासिनी मांडवकर यांनी याची नोंद दाखल केली असून अधिक तपास पोलीस नाईक नलवडे करत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या नावाने पैसे वसुली, अभ्युदय वात्सल्यमच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा