खडसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची बाजी; जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदा खडसेंचा पराभव

जळगावः जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण यांनी मंदा खडसे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. चव्हाण हे ७६ मतांनी विजयी झाले आहेत, मंगेश चव्हाण यांनी स्वतः ही माहिती दिली आहेत. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.

एकनाथ खडसे यांना त्यांच्याच बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिले होते. त्यामुळं ही लढत अटी-तटीची ठरली होती. आता यात मंगेश चव्हाण यांनी ७६ मतांनी विजयी मिळवत मंदा खडसे यांना पराभूत केलं आहे. हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुक्ताईनगर येथील मतदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या विरोधातील शेतकरी पॅनलचे उमेदवार भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे धरणगाव मतदार संघातून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, जामनेर मतदार संघातून गिरीश महाजन, तर पारोळा मतदार संघातून आमदार चिमणराव पाटील हे आघाडीवर आहे

दरम्यान, मतमोजणी केंद्राबाहेर मंगेश चव्हाण हे विजयी झाल्याच्या कार्यकर्त्यांच्यावतीने घोषणाबाजी सुद्धा केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘मंगेश दादा तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, या पद्धतीने जोरदार घोषणाबाजी केली जात असून या घोषणांनी परिसर दूमदूमुन गेला आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजप- शिंदे गटाच्या उमेदवारांनी मुसंडी मारली असून वीस जागांपैकी १६ जागांवर भाजप- शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर ४ जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत. तब्बल सात वर्षानंतर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने सत्ता मिळवली असून एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. भाजप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जोरदार जल्लोष मतमोजणी केंद्राच्या बाहेर केला जात आहे.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे व भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत मंगेश चव्हाण यांनी बाजी मारल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मतदार केंद्रातून काढता पाय घेतला. त्यामुळं जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यावेळी रोहिणी खडसे यांनी
याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र, या निवडणुकीत पैसा चालला, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Source link

bjp vs eknath khadseEknath Khadsejalgaon dudh sangh electionmanda khadseएकनाथ खडसेजळगाव जिल्हा दूध संघ निवडणूकमंदा खडसे
Comments (0)
Add Comment