सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; घाटात बस उलटली, दोन ठार तर १५ जखमी

म. टा. वृत्तसेवा, उरणः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. तर अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबईतील चेंबूरच्या एका खासगी क्लासचे हे सर्व विद्यार्थी आहेत. या बसमध्ये ४८ विद्यार्थी प्रवास करीत होते. जखमी विद्यार्थ्यांवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ऋतिका खन्ना आणि राज म्हात्रे अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मुंबईतील चेंबूर येथील मयांक ट्युटोरिअल्स या खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल मावळ येथील वेट अँड जॉय या थीमपार्कला गेली होती. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी बसने मुंबईकडे परतत असताना, बोरघाटातील मॅजिक पॉइंटजवळ या खासगी बसला अपघात होऊन ती उलटली.

यावेळी या बसमध्ये ४८ विद्यार्थी प्रवास करीत होते. या अपघातात बसमधील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, तर अन्य अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Source link

Maharashtra Road Accidentraigad accidentraigad accident news todayरायगड अपघातरायगड अपघात बातमी
Comments (0)
Add Comment