भूदल, नौदल आणि हवाई दलात काही सैनिकांना विशिष्ट प्रशिक्षण दिलं जाते. जेणेकरुन स्पेशल मिशनवर जाण्यास सक्षम असतील. या मिशनसाठी तयार करणाऱ्या सैनिकांना खडतर प्रशिक्षण दिलं जाते. या प्रशिक्षणानंतर जर महिला अधिकारी नौदलाच्या परीक्षेत खऱ्या उतरल्यातर नौदलात त्यांची मार्कोस (Marcos) म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. भारतीय लष्करासाठी ही ऐतिहासिक घोषणा आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून येत आहे.
नौदलातील महिला आता मरीन कमांडो म्हणजे मार्कोस बनू शकतील. त्यासाठीचे काही निकष असतील ते त्यांना पूर्ण करावे असतील. भारतीय लष्कराच्या इतिहासातील हा गौरवशाली क्षण आहे. परंतु स्पेशल फोर्सेसच्या तुकडीकडे थेट कोणालाही सहभागी होता येत नाही. त्यासाठी महिला कमांडोना स्वयंसेवक म्हणून काम करावं लागेल, असं एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
वाचाः पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; रिक्षाचालक आजपासून पुन्हा संपावर
पुढील वर्षीच्या अग्निवीर भरतीमध्ये भारतीय नौदलात सामील होणाऱ्या महिला अधिकारी आणि नाविक यांना मार्कोसच्या प्रशिक्षणाची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाचाः ‘छत्रपतींचा अवमान करणारे राज्यपाल पंतप्रधानांसोबत कसे?’; उद्धव ठाकरे यांचा सवाल
नौदलातील मार्कोसना अनेक मोहिमांसाठी प्रशिक्षण देण्यात येते. ते समुद्रात, हवेत आणि जमिनीवरही मोहिम राबवू शकतात. हे कमांडो शत्रूच्या युद्धनौका, लष्करी तळ, विशेष डायव्हिंग ऑपरेशन्स आणि टोही मोहिमांवर गुप्त हल्ले करू शकतात. MARCOS हे सागरी क्षेत्रातही दहशतवाद्यांशी लढू शकतात. मार्कोसना दहशतवादविरोधी भूमिकेत काश्मीरमधील वुलर लेक परिसरात तैनात करण्यात आले आहे.
वाचाः पत्नीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात गेला; नंतर समजले तिने भलत्यासोबतच थाटलाय संसार