अखेर चंद्रकांत पाटील यांनी मागितली जाहीर माफी; शाई फेकणाऱ्याबाबतही केले मोठे विधान

मुंबई: राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद गेले काही दिवस राज्यभर उमटले. त्यातच पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक झाल्यानंतर हा मुद्दा अधिकच पेटला. मात्र, त्यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

मी जाहीर माफी मागतो- चंद्रकांत पाटील

एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. पाटील म्हणतात, मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी.

पोलिसांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी- पाटील

ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती, असे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- रुग्णालयांतील रुग्णांना मोठा दिलासा; औषधे खरेदीबाबत अन्न व औषध प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते, महात्मा जोतिबा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे, असेही मंत्री पाटील यांनी अधोरेखित केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ताई, तुम्ही बाईमाणूस आहात; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सुषमा अंधारेंना अजब सल्ला

महापुरुषांच्या महान कार्याबाबत मला मनापासून आदर- चंद्रकांत पाटील

त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते, असे पाटील यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- Breaking : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ विद्यार्थ्यांची बस उलटली; २५ विद्यार्थी जखमी

Source link

Chandrakant Patil apologizedMinister Chandrakant Patilकर्मवीर भाऊराव पाटीलचंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितलीडॉ. बाबासाहेब आंबेडकरमंत्री चंद्रकांत पाटीलमहात्मा जोतिराव फुले
Comments (0)
Add Comment