काँग्रेसचे कोकणातील नेतृत्व हरपले; माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

हायलाइट्स:

  • काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन
  • काँग्रेसचे कोकणातील नेृतृत्व हरपल्याची भावना
  • महाराष्ट्र काँग्रेसनं दिली अधिकृत माहिती

मुंबईः महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे आज मुंबईत निधन झालं आहे. जगताप यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती त्यानंतर उपचारांसाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

माणिकराव जगताप यांचे वय ५४ होते. जगताप यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी १२ च्या सुमारास त्यांचं निधन झालं आहे. जगताप यांच्या निधनानं काँग्रेस पक्षानं कतृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून ते २०१४ च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडणून आले होते. जगताप यांच्यावर रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी होती. तसेच, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. आज दुपारी २ वाजता महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माझे निकटचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे,’ अशी भावना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

माजी आमदार माणिकराव जगताप हे उत्तम संघटक होते, लोकप्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली असून, मी एक बंधुतुल्य मित्र गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले यांनी वाहिली श्रद्धांजली

महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. जगताप यांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला, अशा शोकभावना नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

Source link

Ashok ChavanMaharashtra Congressmanikrao jagtapअशोक चव्हाणमहाराष्ट्र काँग्रेसमाणिकराव जगताप
Comments (0)
Add Comment