सम्राट चौक येथील एका सामुदायिक विवाह सोहळ्यात शाईफेक करण्यात आली. न्यू बुधवार पेठ येथील बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार 13 डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली आहे.
भीम आर्मीने इशारा दिला होता
सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना भीम आर्मीने जाहीर इशारा दिला होता. जोपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत भाजपाच्या एकाही नेत्याला कार्यक्रमास जाऊ देणार नाही, फिरू देणार नाही आणि जर गेलेच तर तोंडाला काळं फासल्याशिवाय भीम आर्मी शांत बसणार नाही, असा इशारा दिला होता.
विवाह सोहळ्यात शाई फेक
सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ येथे एका विवाह सोहळ्याला आमदार विजयकुमार देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते त्याठिकाणी गेले असता भीम आर्मीच्या अजय मैनदरगीकर या कार्यकर्त्याने भाजप आमदारावर शाई फेकून त्यांना काळं फसण्याच्या प्रयत्न केला आहे.
हेही वाचा : ‘शेतकरी बापाने १० स्थळं पाहिले, पण शेती करतो म्हणून मुलीकडच्यांनी नकार दिला’
आमदार देशमुख यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याची माहिती होताच उपस्थित पोलिसांनी ताबडतोब भीम आर्मीच्या कार्यकर्त्यास ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी भीम आर्मीच्या युवकाला ताब्यात घेऊन जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नेले. आमदार देशमुख हे शर्ट बदलून त्या कार्यक्रमाला तिथेच थांबले आहेत अशी माहिती मिळाली.
हेही वाचा : प्राप्तिकर विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांना नागपुरात सीबीआयची अटक, डमी उमेदवार बसवून परीक्षा