नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवर्धन शिवारात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. प्राची पवार या तिथे त्यांच्या फार्म हाऊसमध्ये गेल्या असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरु केलं आहे.
प्राची पवार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हल्ला कोणत्या कारणामुळं झाला हे अद्याप सांगितलेलं नाही. प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याचे कारण अस्पष्ट असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
कसा झाला हल्ला?
प्राची पवार ज्या फार्म हाऊसमध्ये येणार होत्या, त्या ठिकाणी हल्लेखोरांपैकी दोघेजण फार्म हाऊसलगतच्या झाडीत लपले होते. त्यांनी दुचाकी पवार फार्म हाऊसजवळ आणली. तेव्हा, प्राची यांनी त्यांना हटकले होते. तेव्हा, हल्लेखोरांनी पवार यांच्यावर हल्ला करुन पोबारा केला.
प्राची पवार यांची प्रकृती गंभीर
नाशिक शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच डॉ. प्राची पवार यांच्यावर अज्ञात समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्राची पवार यांच्यावर हल्ला का झाला याबाबतचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राची पवार यांच्यावर धारधार शास्त्राने केला हल्ला करण्यात आला आहे त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार करीत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शिंदे-फडणवीसांचा ठाकरेंना दणका!, ACB चौकशी लावलेली ती योजना पुन्हा सुरू
राष्ट्रवादीच्या गोटातही खळबळ
प्राची पवार या माझी आमदार व राष्ट्रवादीचे माजी दिग्गज नेते वसंत पवार यांची मुलगी आहे.प्राची पवार यांच्यावर हल्ला झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली आहे. प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात असून चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्यावर हल्ला झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात देखील खळबळ उडाली आहे.
शिंदे-फडणवीसांचा ठाकरेंना धक्का, महाधिवक्तापदासाठी सराफांचं नाव आघाडीवर; वाचा, टॉप १० न्यूज
रुग्णालय परिसरात गर्दी
डॉ. प्राची पवार यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात त्यांच्या कार्यकर्त्यांसह नातेवाईकांनी गर्दी केली असून सरकारला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे हे देखील दाखल झाले आहेत.
मनी शंकर आय हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्राची पवार यांच्यावर गिरणारे रोडवरील त्यांच्या गोवर्धन येथील फार्म हाऊस जवळ हल्ला झाला आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून. त्यांना तातडीने सुश्रुत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. आरडा ओरडा झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र हल्लेखोर तिथून पसार झाले आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नांगरे पाटील, सदानंद दाते, अमिताभ गुप्तांचा समावेश