संबंधित व्यक्तीचा खून करून पाच जणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे एक दोन नव्हे तर तब्बल चार कोटी रुपयांची विम्याची रक्कम हडप केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार नाशिकमधील मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दत घडा असून या प्रकरणी त्यांनी एका महिलेसह ५ जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच संशयितांनी आधी कट करून आधी खून केला. नंतर महिलेला मृत झालेल्या व्यक्तीची पत्नी म्हणून दाखवले. यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली होती.
वाचा- अमित शाहांची सासुरवाडी कोल्हापूरलाच बसतायेत सीमावादाचे सर्वाधिक चटके
अशोक रमेश भालेराव या व्यक्तीचा मृतदेह २ सप्टेंबर २०२१ रोजी इंदिरा नगर जॉगिंग परिसरात आढळला होता. रस्त्याच्या कडेला दुचाकी पडलेली होती त्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी अशोक यांच्या भावाने संशय व्यक्त करणारे पत्र पोलिसांना दिले. या घटनेबाबत पुन्हा एकदा तपास करताना पोलिसांना जी माहिती मिळाली त्यावरून तपासाची चक्रे वेगळ्याच दिशेला गेली. अशोक यांच्या विम्याचे चार कोटी रुपये रजनी उके या महिलेच्या नावावर जमा झाल्याचे समोर आले.
वाचा- स्मृती मंधानाने इतिहास घडवला; असा विक्रम पुरुषांच्या क्रिकेटमध्ये एकालाही जमला नाही
महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने या प्रकरणी अन्य चार जणांची नावे सांगितली. यापैकी मंगेश सावकार याने चौकशीत खून करून अपघात असल्याचा बनाव केला आणि विम्याची रक्कम वाटून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी रजनी, मंगेश आणि प्रणव साळवीसह अन्य दोघांना अटक केली आहे.