धुळे शहरातील मुंबई – आग्रा महामार्ग क्रमांक ३ येथे वरखेडी रोड येथे ट्रक बिघडला होता. तो दुरुस्त करण्यासाठी महिंद्रा कंपनीचे २ मेकॅनिक गेले होते. ट्रक दुरुस्तीचे काम महामार्ग येथे मेकॅनिकलसह अन्य तीन जण करत असताना याच दरम्यान मालेगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने पुढील ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्या ट्रकने काही अंतरावर उभे असलेल्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात मेकॅनिकल आणि त्याचा सहकारी रस्त्यावर फेकले गेले. ते दोघे रक्तबंबाळ झाले होते. त्यात दोघींचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अहो बाई आधी अभ्यास करा; वारकरी आक्रमक,सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
या अपघाताची माहिती मिळताच आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत दोघी आणि गंभीर अशा चौघांना तातडीने उपचारार्थ रुग्णवाहिकेतून हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी विजय पाटील आणि रमाकांत पाटील दोघे राहणार अवधान यांना मृत घोषित केले आणि दोघे गंभीर जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात झालेल्या महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. या दुर्दैवी घटनेत दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव ज्ञानसिंग भावर हा मध्यप्रदेश मधील रहिवाशी आहे. तर एकाची ओळख अजून पटू शकलेली नाही, अशी माहिती आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिली आहे. अपघाताच्या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्याचे काम सुरू होते.