स्कॉर्पिओतून स्टाईलमध्ये उतरला, समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार, तरुणाची स्टंटबाजी चर्चेत

औरंगाबाद : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुरु होऊन अवघे काही दिवस होत नाहीत, तोच अपघाताची बातमी समोर आली होती. आता याच महामार्गावर एक तरुण हातात बंदूक घेऊन गोळीबार करतानाचे रिल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून हा तरुण कोण आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे नागपूर ते शिर्डी या 510 किमीच्या पहिल्या टप्प्याच्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. हा महामार्ग सुरु होऊन अवघे काही दिवस होत नाहीत, तोच औरंगाबदेतील फुलंब्री जवळील बोगद्याच्या जवळ घडलेली एक धक्कादायक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक काळ्या रंगाची स्कार्पियो गाडी आहे. त्या गाडीच्या पाठीमागून एक तरुण हातात बंदूक घेऊन येताना दिसत आहे. तरुण काही अंतरावर गाडीच्या पुढे येताच बंदूकीचे तोंड आकाशाकडे करून हवेत गोळीबार करताना दिसत आहे.

या व्हिडिओत वापरण्यात आलेली बंदूक ही खरी आहे का? हवेत गोळीबार करणारा तरुण कोण आहे? हे समोर आलेले नसून या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून या घटनेमुळे मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

समृद्धी महामार्गावर पहिला अपघात

दुसरीकडे, भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मर्सिडीज बेंझ कारने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वायफळ टोल नाक्याजवळ स्विफ्ट कारला धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अपघातात लाल रंगाच्या स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे. मर्सिडीज बेंझ कारने या स्विफ्ट कारला पाठीमागून धडक दिली होती. स्विफ्ट कार टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या एका मर्सिडीज बेंझ कारने उभ्या असलेल्या या कारला मागून धडक दिली. मर्सिडीज बेंझ या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : भयंकर! मुलानं वडिलांना निर्घृणपणे संपवलं, तुकडे १०० फूट खाली; पोलिसांना पोकलेन आणावी लागली

दरम्यान, उद्घाटनानंतर थोड्याच वेळात पुलगाव जवळील मार्गावर एका माकडाचा मृत्यू झाल्याचा फोटो समोर आला होता. वेगवान वाहनाने माकडाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागपूर-मुंबई प्रवासाचा कालावधी सध्याच्या १६ तासांवरून आठ तासांवर आणण्याच्या आश्वासनासह, या एक्स्प्रेस वेवर वाहनचालकांसाठी प्रतितास १२० किमी इतक्या वेगाची परवानगी देण्यात आलेली आहे.

हेही वाचा : महावितरणमुळे टिकटॉक स्टार संतोष मुंडेला गमावलं, कुटुंबाचा आरोप, गाव धाय मोकलून रडलं

Source link

aurangabad firingmaharashtra crime newssamruddhi express waysamruddhi express way firing reelscorpio car reelsocial media viral videoऔरंगाबाद रील गोळीबारसमृद्धी महामार्ग हवेत गोळीबारसोशल मीडिया व्हायरल रीलस्कॉर्पिओ कार गोळीबार
Comments (0)
Add Comment