देशभरात महामार्गांवर दरवर्षी पाच लाख अपघात होत असतात. हे पाहता रस्ते अपघातांच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. या अपघातांमध्ये जितके लोक मरतात तितके लोक कोणत्याही साथीच्या रोगात, मारामारीत किंवा दंगलीत मरत नाहीत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! विम्याच्या पैशांसाठी कटात सहभागी मित्रालाच संपवले, अपघाताचा बनाव रचला, शेवटी…
सेललिब्रिटींचेही घेतले जाणार सहकार्य
महामार्गांवर होणाऱ्या अशा अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कामासाठी सेलिब्रिटींचेही सहकार्य घेतले जात असल्याचे गडकरी म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- ज्यांनी टीका केली त्या सुप्रिया सुळे यांनी देखील निर्भया पथकातील गाडी वापरली; चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
सरकार नवीन दर्जेदार असे रस्ते बांधण्याचे काम करत आहे. अशा रस्त्यांमुळे अनेक शहरांमधील अंतर कमी होईल असे ते म्हणाले. या नवीन रस्त्यांच्या निर्मितीनंतर दिल्ली ते चंदीगडचे अंतर अडीच तासांनी कमी होईल, तसेच दिल्लीहून जयपूर, डेहराडून आणि हरिद्वारला दोन तासात पोहोचता येईल, अशी माहितीही गडकरी यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा- शाईफेक आंदोलनातील कार्यकर्त्याला मोठा दिलासा: तो गंभीर गुन्हा मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश