नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीची गरज असते. त्यांच्या माध्यमातूनच सभागृहात आवाज उठवला जातो. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हायला पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी आज ठाण्यात व्यक्त केलं. यावेळी पत्रकारांशी चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांनी शहरातील वाहतुकीच्या समस्या ते पॅनल पद्धतीने होत असलेल्या निवडणुकांच्या मुद्द्यांवर खरपूस समाचार घेतला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत काहीच निश्चित दिसत नाही. या निवडणुका कधी होणार? या बाबत विविध चर्चा ऐकायला येत आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी गरजेचे आहेत. हेच लोकप्रिनिधी सभागृहात नसतील, तर या प्रश्नांवर वाचा कोण फोडणार? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आणि महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका या लवकरात लवकर व्हाव्यात, असे राज ठाकरे म्हणाले.
ताई, तुम्ही बाईमाणूस आहात; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सुषमा अंधारेंना अजब सल्ला
ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडवायची असेल तर त्याकरिता ठोस अशी नियमावली राबवणे गरजेचे आहे. एका व्यक्तीकडे किती वाहने हवीत, यालाही मर्यादा हवी. तसेच नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सवय पडणे गरजेचं आहे. आणि तरच मेट्रो सारखे प्रकल्प यशस्वी होऊ शकतील, असे राज ठाकरे म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे ज्या सोयीसुविधा महापालिका प्रशासनाने देणे गरजेचे आहे, त्या सुविधा बिल्डर रहिवाश्यांकडूनचं पैसे घेऊन पुरवतात. त्यामुळे शहरे ही महापालिका नव्हे तर बिल्डर चालवत असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला. येत्या काही दिवसांत मी ठाण्याचा चार ते पाच दिवसांचा दौरा करणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
डोबिंवली शिवसेना शहरप्रमुख राजीनाम्याच्या तयारीत? ठाकरे गटाच्या जिल्हा नेतृत्वावर