आमदार राजन साळवींची ACBकडून साडेचार तास कसून चौकशी, कारवाई होणार की सुटका?

रायगड : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी हे लाचलुचपत विभागाच्या (ACB) रडावर आहेत. रायगडमधील अलिबाग येथील ACBच्या कार्यालयात राजन साळवी यांची आज तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी शक्तीप्रदर्शन करत ते रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे दाखल झाले होते.

राजकीय प्रवासादरम्यान आपण संपत्ती जमवून ठेवली असल्याचे लाचलुचपत विभागाला वाटतं आहे. लाचलुचपत विभागाने माहिती भरण्यासाठी सहा फॉर्म दिले आहेत. येत्या २० जानेवारीपर्यंत ही माहिती सादर करावी लागणार आहे. न्याय व्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. या चौकशीमध्ये वादग्रस्त काहीच आढळणार नाही. तक्रार देणाऱ्यांचा भ्रमनिरास होणार आहे, असा दावा आमदार राजन साळवी यांनी माध्यमांसमोर केला.

आमदार राजन साळवी हे आज सकाळी साडे अकरा वाजता अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी आमदार राजन साळवी यांच्या समवेत उपस्थित असलेल्या शेकडो शिवसैनिकांनी एसीबी कार्यालयाच्या बाहेर जमून घोषणाबाजी केली. साडेचार तास अधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यामध्ये राजकीय प्रवास, कौटुंबिक व्यवसाय आणि वाढलेल्या संपत्तीबाबत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले.

लाचलुचपत विभागाच्या चौकशीला सामोरा गेलो. अधिकाऱ्यांनी मला पत्नी, मुले, माझे दोन्ही भाऊ, त्यांचे कुटुंबीय आणि माझी स्वतःची चौकशी केली. आमच्या व्यवसायाबाबत विचारणा केली. विचारलेल्या प्रश्नांची माहिती लाचलुचपत विभागाकडे सुपूर्द केली आहे. जी माहिती आता देता आली नाही ती माहिती लाचलुचपत विभागाला द्यायची आहे. लाचलुचपत विभागाने मला सहा फॉर्म दिले आहेत. ते सर्व फॉर्म वकिलांच्या मार्फत भरून देण्यात येणार आहेत. मी खरेदी केलेल्या संपत्तीची माहिती लाचलुचपत विभागाला हवी आहे. ती सविस्तर माहिती २० जानेवारीपर्यंत देण्याचे त्यांना कबुल केले आहे. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि माहिती मी अधिकाऱ्यांना दिली आहे, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबीकडून चौकशी; शक्तिप्रदर्शन करत झाले अलिबागमध्ये दाखल

मी राजकीय दृष्ट्या कसा पुढे गेलो? नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार या राजकीय प्रवासात माझी संपत्ती वाढत गेली, असे लाचलुचपत विभागाला वाटते. मला नोटीस आली. पण आपल्याविरोधात तक्रार कोणी केली? याची माहिती एसीबीकडे मागितली. मात्र एसीबीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला. तरीही आम्ही माहिती काढली आहे. तक्रार करणारा खेड लोटे येथील असल्याचे समजले आहे. आम्ही त्याचा शोध घेणार आहोत. तसंच नागरिक म्हणून आपण तक्रार केली, तर कारवाई करण्याबाबतचे आश्वासन एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे आमदार राजन साळवी म्हणाले.

राज ठाकरेंच्या स्वागतासाठी जमलेल्या अनेकांचा हिरमोड, दापोलीत नेमकं काय घडलं?

Source link

acb investigationraigad newsrajan salvirajan salvi latest newsShiv Sena MLAshiv sena mla rajan salviUddhav Thackeray
Comments (0)
Add Comment