या प्रकरणी पतीने दिलेल्या फिर्यादीवरून एक अनोळखी मोबाईल क्रमांकावरून त्यांना फोन आला, “तुझ्या पत्नीचे लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत. त्या दोघांचे खासगी फोटो आणि काही खासगीतील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहेत.” असे सांगून संशयिताने पत्नीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईलवर पाठवले आणि हे प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे म्हणत पैशाची मागणी केली.
तक्रारदार पतीने बदनामीच्या भीतीने ४ लाख ५० हजार रुपये दिले. दरम्यान, ब्लॅकमेल करण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ पाठवलेला नंबर कुठला आहे. याबाबत अंबड पोलिसांकडून तपास सुरू आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचून दोघांचे अश्लील फोटो मोबाईलवर पाठवले. पतीने समाजात बदनामी होईल. या भीतीने ४ लाख ५० हजार रुपये दिले. पत्नी मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप तक्रारदार पतीने तक्रारीत केला आहे. तक्रारदाराने न्यायालयात पत्नी व प्रियकराच्या विरोधात तक्रार दिली होती. न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने पत्नी व प्रियकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, तक्रारदार पतीने पुरुषाने दोन महिन्यापूर्वी पत्नी आणि सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची देखील माहिती मिळाली आहे. न्यायालयाच्या आदेशाने दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डुक्कर विष्णूचा अवतार, त्याचा दात पाण्यात ठेवून मुलींना पाजा, कालीचरण महाराजांचा अजब सल्ला