आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरण: सोमय्या पितापुत्रांना मुंबई पोलिसांची ‘क्लीन चीट’

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका भंगारात जाण्यापासून वाचवून तिचे संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी ५७ कोटी रुपये जमवले आणि ती रक्कम राज्यपालांकडे जमा न करता त्या निधीचा अपहार केला,’ या आरोपांतून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना ‘क्लीन चीट’ दिली आहे.

निधी अपहाराच्या आरोपांबाबत पुरावे आढळले नाहीत, असे निदर्शनास आणून ‘ईओडब्ल्यू’ने कनिष्ठ न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला. यापूर्वी ‘ईओडब्ल्यू’ने मुंबई उच्च न्यायालयातही ऑगस्टमध्ये सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान पुरावे सापडले नसल्याची माहिती दिली होती.

‘आयएनएस विक्रांतसाठी कोट्यवधींचा निधी जमवल्यानंतर सोमय्यांनी तो राज्यपाल कार्यालयाकडे जमा केला नाही, असे माहितीच्या अधिकारातून समोर आले होते. यावरून त्यांनी निधीचा अपहार केल्याचा संशय आहे, अशी तक्रार माजी सैनिकाने दिल्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी ६ एप्रिलला दोघांविरोधात एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ‘ईओडब्ल्यू’कडे हस्तांतर झाला. ‘शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बिनबुडाचे आरोप केल्यानंतर केवळ राजकीय हेतूने आम्हाला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले’, असा दावा सोमय्यांनी केला होता.

Source link

ins vikrant 'cheating' caseKirit Somaiyakirit somaiya and ins vikrantMumbai Policeकिरीट सोमय्या
Comments (0)
Add Comment