पुण्यात २६ वर्षीय तरुणी टॉयलेटमध्ये गेली अन् अचानक मोबाईल दिसला; प्रसिद्ध इन्स्टिट्यूटमधील घटना

पुणे : पुण्यातील नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या महिला शौचालयात मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महिला स्वच्छतागृहातून एकाने तरूणीचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. पाषाण येथील इन्स्टिट्यूटमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटमधील या घटनेबाबत २६ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. ही घटना ५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित तरूणी ही संस्थेत एका प्रोजेक्टचे काम करते. सोमवारी (दि.५) सायंकाळी तरूणी येथील स्वच्छतागृहात गेली होती. यावेळी शेजारील स्वच्छतागृहातून एकाने व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. तरूणीने मोबाईल पाहिल्यानंतर आरडाओरड केल्याने तरूण पळून गेला.

अजबच! महिलेने दिला चार पाय असलेल्या मुलीला जन्म, लोक म्हणाले हा तर दैवी चमत्कार…

याप्रकरणी तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी येथील सीसीटीव्ही तपासणी केली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास चतुश्रुंगी पोलीस करत आहेत.

दरम्यान, पुण्यासारख्या शहरात असा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून काही कडक कारवाई केली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

pune news todayPune Policepune science institute newswomen toilet newsपुणे क्राइम न्यूजपुणे ताज्या बातम्यापुणे पोलीसपुणे सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट
Comments (0)
Add Comment