जुना वाद, डोक्यात राग, समोरासमोर आले अन् रागाचा भडका; तरुणाचा जीवच घेतला; जळगावात खळबळ

जळगाव : जळगाव शहरातील जुने बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाचा चाकू भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आकाश सुरेश सपकाळे (वय ३० रा. कोळीपेठ, जैनाबाद, जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, जुन्या वादाचा तरुणांच्या दोन गटात भडका उडाला आणि यातूनचं तरुणाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा केला जात असताना दुसरीकडे जळगावात घडलेल्या या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप अव्वल, राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
जळगाव शहरातील जुने बसस्थानकजवळ एका दुकानासमोर दोन गट समोरासमोर आल्याने जुन्या वादातून शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने एकाने आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे या तरूणावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. तसेच आकाशचा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि त्याचा मित्र सागर आनंदा सपकाळे यांच्यावरही वार केल्याने ते दोन जण जखमी झाले आहे.

या दरम्यान जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यासह जिल्हापेठ व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्र परिवाराची प्रचंड गर्दी जमली होती. तरूणावर वार करणारा आण्णा उर्फ गोपाळ कैलास सैंदाणे (रा. कोळी पेठ, जळगाव) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हत्या करण्याचे नेमके खरे कारण समोर आलेले नसून जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.

परदेशातून थेट सरपंचपदाच्या आखाड्यात, दणदणीत विजयही मिळवला; २१ वर्षीय तरुणीची राज्यभर चर्चा

Source link

Jalgaon Crimejalgaon local newsjalgaon murder newsmaharashtra crime newsजळगाव क्राईमजळगाव लोकल बातम्याजळगाव हत्या बातमीमहाराष्ट्र क्राईम बातम्या
Comments (0)
Add Comment