आम्ही लग्नाळू! पण बायको मिळेना; बाशिंग बांधून इच्छुक नवरदेवांची जिल्हाधिकाऱ्यांकडे वरात

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गर्भ लिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी न झाल्याने सोलापूरच्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. लग्नाचं वय निघून चाललं आहे, वधू पक्षांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. कायम रोजगार नाही, सरकारी नोकरी नाही, मुलगा शेतीच करतो, अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आमची लग्नाची वयं उलटून चालली आहेत. आम्हाला एखादी बायको द्या, अशी प्रमुख मागणी करत क्रांती ज्योती परिषदे मार्फत मोर्चा काढला होता. इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या घटली

क्रांती ज्योती परिषदेचे प्रमुख रमेश बारसकर यांनी माहिती देताना सांगितले की, देशातील फक्त केरळ राज्यात मुलींची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र राज्यात हजार पुरुषांमागे संख्या कमी होत चालली आहे. सोलापूर जिल्ह्यातील देखील परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकारने यासाठी पीसीपीएनडीटी कायदा आणला आहे, पण या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशा विविध मागण्या करत मोहोळ तालुक्यातील इच्छुक नवरदेवांनी शहरातील होम मैदानावर एकत्र येत घोड्यावर बसून वरात काढली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुक नवरदेवांची मिरवणूक

जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर वरात काढत निवेदनाद्वारे मागणी केली आहे, आम्हाला मुलगी द्या, अन्यथा मुली न मिळण्याची समस्या आहेत, त्या अडचणी दूर करा अशा विविध मागण्या करत, माथ्यावर मुंडावळ्या बांधून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घोड्यावर बसलेल्या नवरदेवांकडून माहिती घेतली असता, शिक्षण झालंय, शेती करतो, लग्नाचं वय झालं तरी ही मुलगी मिळत नाही अशी खंत व्यक्त केली.

हेही वाचा : आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची ती करा, राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांना ताकीद

Source link

groom bride marriage newsMaharashtra news todaysolapur collector officesolapur grooms morchasolapur grooms not getting wifeबायको मिळावी म्हणून मोर्चालग्न नवरा बायकोविवाह इच्छुक नवरदेव मोर्चासोलापूर इच्छुक नवरदेव मोर्चासोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय
Comments (0)
Add Comment