महिलांसाठी मोठी बातमी! महिला चालक असलेल्या वाहनांसाठी सार्वजनिक पार्किंगमध्ये २० टक्के आरक्षण

20 percent reservation in parking : राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिलांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता महिला चालक असलेल्या वाहनांसाठी सार्वजनिक वाहन पार्किंगमध्ये २० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. महिलांची सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी कुचंबना होत असते. अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते. यासाठीच मंत्री लोढा यांनी ही घोषणा केली आहे.

 

महिला चालक असलेल्या वाहनांसाठी सार्वजनिक पार्किंगमध्ये २० टक्के आरक्षण
नागपूर : राज्यातील सार्वजनिक वाहन पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांसाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेवर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.

मंत्री लोढा म्हणाले की, राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी महिला आता वाहने चालविताना दिसत आहेत. कॅबचालक म्हणूनही महिला काम करत आहेत. सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी त्यांची होणारी कुचंबना, गैरसोय पाहता आता अशा सार्वजनिक पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांना २० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- दोन मुलांना सोडून ती प्रियकरासोबत गेली, नवऱ्याने परत आणले; बदनामी होताच प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचे पाऊल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

mangalprabhat lodhanagpur assembly sessionReservation for women in parkingनागपूरमंगलप्रभात लोढाविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनहिला चालक असलेल्या वाहनांसाठी आरक्षण
Comments (0)
Add Comment