भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांची तब्येत बिघडल्याने त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पाचपुते आजारी आहेत. मात्र अधिवेशनाच्या निमित्ताने ते नागपुरात आलेत.
हायलाइट्स:
- बबनराव पाचपुते यांची तब्येत बिघडली
- नागपूरच्या खासगी रुग्णालयात भरती
बबनराव पाचपुतेंना आज त्रास सुरु झाल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना नेलं. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतु पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तुर्तास त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
रुग्णवाहिका फसली
बबनराव पाचपुते यांना रुग्णालयात दाखल करून रुग्णवाहिका परत विधान भवन परिसरात आली. विधान भवनाच्या मागच्या द्वारातून आत येत असताना एक गटाराच्या चेंबरमध्ये मागचे चाक फलसे. लोकांनी धक्का मारून तिला बाहेर काढले.
कोण आहेत बबनराव पाचपुते?
- बबनराव पाचपुचे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, गेल्या ३५ वर्षांपासून ते आमदार आहेत
- एकेकाळचं राष्ट्रवादीतलं मोठं नाव, शरद पवार यांचे जवळचे सहकारी राहिले
- पण आदिवासी विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
- याआधी त्यांनी गृहराज्यमंत्री, वनमंत्री, आदिवासी विकास विभागाची धुरा सांभाळली
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.