Anish Bendre | Maharashtra Times | Updated: 22 Dec 2022, 5:24 pm
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं. पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पाच वर्षांपासून त्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, आठ डिसेंबरपासून पुण्यातील गॅलॅक्सी रुग्णालयात त्या ऍडमिट होत्या, गुरुवारी (२२ डिसेंबर) दुपारी साडे तीन वाजता त्यांचं निधन झालं.उद्या सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत पुण्यातील केसरीवाडा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, तर 11 वाजल्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.