१७ जानेवारी २०२३ रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश झाल्यामुळे विपरीत राजयोग तयार होत आहे. कुंभ हे शनिदेवाचे स्वामी आहे. या राशीत आल्याने शनी त्याच्या स्वभावाविरुद्ध जाऊन अनेक राशींना लाभ आणि प्रगती देईल. तृतीय, षष्ठ, अष्टम, आणि द्वादश स्थानाचा कारक ग्रह जर तिसर्या, सहाव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानात असेल किंवा परस्पर एकमेकांच्या स्थानात राशी परिवर्तन करत असतील. आणि कोणत्याही शुभ ग्रहांची दृष्टी या स्थानातील ग्रहांवरती नसेल तर कुंडली मधे विपरीत राजयोगाची निर्मिती होते. खरं तर, शनी ज्या राशीच्या तिसर्या, सहाव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानी संचार करतो त्याला प्रतिकूल परिणाम देतो. परंतु २०२३ मध्ये जेव्हा शनी कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा तो ‘या’ राशींच्या लोकांना नुकसान ऐवजी लाभ देईल.