रामदास कदम हे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. आदित्य ठाकरे तुम्ही कशाला घाबरता, ज्याला कर नाही त्याला डर कसला. तुम्ही चौकशीला न घाबरता समोर जायला हवे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावली आहे ते अतिशय योग्यच आहे. दूध का दूध और पानी का पानी होऊन जाऊ दे. सगळ्यांना तीस वर्षाच्या तरुणांनी चौकशीला घाबरण्याची गरज काय, अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘दलित पँथर ही आग आहे, पिढ्यानपिढ्या जळत राहणार’; डॉ. सूरज येंगडे यांनी व्यक्त केला ठाम विश्वास
आदित्य ठाकरे हे आता घाबरल्यामुळेच मुख्यमंत्र्यांवर धादांत खोटे आरोप करत आहेत. खोटे आरोप करत त्यांना बदनाम करून महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे, असा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा
नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. मात्र, नगर विकास खात्यामध्ये हस्तक्षेप कोण करत होते, हे खाते कोण चालवत होते हे अख्ख्या जगाला माहिती आहे, असा आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- खासदार राहुल शेवाळे अडचणीत येणार?; उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे ‘त्या’ प्रकरणी SIT मार्फत चौकशीचे निर्देश
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेनंतर आता उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू; चिमुकल्याला मांडीवर घेऊन नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन, रुग्णालयावर मोठा आरोप