मुंब्रा येथे रिदा रशीद एक सामाजिक संस्था चालवतात. त्यांनी गरजू महिलांना गैर कृत्य करण्यासाठी भाग पडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रिदा रशीद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
इमरान खानच्या घटस्फोटित पत्नीचं तिसरं लग्न, रेहम खानच्या पतीच्या वयातील अंतर वाचून थक्क व्हाल
रिदा रशीद या मुंब्रा परिसरात काम करतात. त्यांच्याकडे कामाच्या शोधात असलेल्या काही महिला गेल्या होत्या. रिदा रशीद यांनी हॉटेलमध्ये घेऊन जाऊन गैरकृत्य करण्यास पाठवल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. तक्रार करणारी महिला ही घटस्फोटित महिला असून तिला दोन मुले आहेत. उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीच्या शोधात असलेल्या या महिलेने रिदा रशीद यांची भेट घेतली होती. रिदा रशीद यांनी नोकरी देते म्हणून एका हॉटेलमध्ये जायला सांगितले. त्याठिकाणी या महिलांसोबत गैरकृत्य केले जात होते, असा आरोप संबंधित महिलेने केला. महिलेने सांगितले की आम्हाला हॉटेलचे नाव सांगण्यात आले नाही मात्र आम्हाला हॉटेल मधून घेऊन जाण्यासाठी एक गाडी उपलब्ध करून देण्यात आली होती. मला दोन लहान मुले असल्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी नाईलाजाने आम्हाला हे काम करावे लागलं असल्याचे या तक्रारदार महिलेने सांगितले.
IPL 2023 Auction मध्ये कोणत्या खेळाडूंना कोणीच वाली नाही, पाहा unsold खेळाडूंची यादी
तक्रारदार महिलेने केलेल्या तक्रारी नंतर मुंब्रा पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रिदा रशीद यांच्या विरोधात रजि. १२०४ भादंवि ३७० (ए), पिटा तसेच पॉक्सो अंतर्गत कलम ४, १०, ६, आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कडलग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सिक्कीममध्ये सैन्य दलाच्या वाहनाचा अपघात, १६ जवानांना वीरमरण तर ठाकरेंच्या अडचणीत वाढ, वाचा मटा टॉप १० न्यूज