महिलेने सिव्हिल कोर्टात पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. महिलेने अर्जात लिहलं आहे की, पतीकडून ती तिच्या खर्चासाठी व मेकअपचं सामान खरेदी करण्यासाठी पैसे मागते. मात्र, तो तिला पैसे देत नाही. तसंच, पती तिला सारखे टोमणे मारतो, असंही तिने अर्जात लिहलं आहे.
पती सारखा तिला तिच्या रंग-रुपावरुन बोलतो. तुझा चेहरा सुंदर नाही, म्हणून मला तुझ्यासोबत राहायचं नाही, असं तो मला बोलत असतो, असं महिलेने म्हटलं आहे. महिलेने तिच्या सासू-सासऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत.
वाचाः आसनगाव स्थानकात प्रवाशांच्या रागाचा उद्रेक, रेल्वे रुळावर उतरून लोकसमोरच रेल रोको आंदोलन
२०१५मध्ये दिल्लीत राहणाऱ्या एका मुलासोबत लग्न झालं होतं. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. लग्नाच्या सुरुवातीला सर्वकाही ठिक होतं. मात्र, काही दिवसांनी माझ्या पतीचं वागणं बदललं. मी जेव्हा मेकअपसाठी पैसे मागायची तेव्हा ते द्यायचे नाहीत. तसंच, घर खर्चासाठीही पैसे देत नव्हते. सासू-सासरेही माझ्या पतीचीच साथ द्यायचे. पती मला म्हणायचा की मी त्याच्या लायक नाही. माझा चेहरा सुंदर नाही, अशा शब्दात पती मला हिणवायचा, असं महिलेने अर्जात म्हटलं आहे.
वाचाः आक्षेपार्ह व्हिडीओ तात्काळ हटवा; ‘त्या’ विद्यार्थिनीबाबत न्यायालयाचे निर्देश
एकदा सासू-सासरे आणि पती तिघांनी मिळून मला घराबाहेर काढलं. मी माझ्या आई-बाबांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनीही माझी मदत केली नाही. माझ्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत. मात्र, अजून मला मुल झाली नाही. म्हणून मी डॉक्टरांकडे जाऊन उपचारही करुन घतले. माझं ऑपरेशन झालं त्याचा खर्चही माझ्या बहिणीने केला. पतीकडे जेव्हा खर्च मागितला तेव्हा त्यांने स्पष्टपणे नकार दिला, असं महिलेने म्हटलं आहे.
वाचाः एन-९५ मास्क कुठे मिळतात? औषधविक्रेत्यांकडे एन ९५ मास्कची उपलब्धता नाही