सुट्टीसाठी मामाच्या घरी मोहोळला
पंढरपूर येथील संत निरंकारी मठ, सांगोला रोड येथे राहणारे तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे युवराज भालेराव हे मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे दोन दिवस मामाच्या घरी राहण्यासाठी आले होते.
दरम्यान, शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी अचानकपणे चक्कर येऊन ते खाली पडले. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ दाखल करण्यात आले, येथे मात्र डॉक्टरांनी तपासणी करून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.
हेही वाचा : डेटिंग app वर ओळख, १९ वर्षीय विद्यार्थी गेला तरुणाच्या रुमवर, ‘त्या’ घटनेनंतर आयुष्यच संपवलं
पीएसआय युवराज भालेरावांच्या मृत्यूने हळहळ
पीएसआय युवराज भालेराव यांच्या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस खात्या अंतर्गत नुकत्याच झालेल्या पदोन्नतीमध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या पश्चात दोन अविवाहित मुले व पत्नी असा परिवार आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाणे येथे झाली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सचिन मुसळे हे करीत आहेत.
हेही वाचा : मला भरुन येतंय, जयकुमार गोरेंच्या पत्नीचं कार्यकर्त्यांना आवाहन; तर वडिलांना घातपाताची शंका