याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात राकेश उर्फ राधेश्याम टिकमदास वैष्णव बैरागी यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असता गंगापूर पोलिसांना बापू पूल परिसरात एक अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याचं समजलं. बोटिंगला आलेल्या अंबादास तांबे यांनी हा मृतदेह बघितला होता. त्यानंतर त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळवली होती.
सदर मृतदेहाबाबत चौकशी केली असता अंबड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असलेल्या राकेश यांचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर राकेश यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांकडे केली होती. त्यावेळी गंगापूर पोलिसांनी तपासात काही आढळून आल्यास गुन्हा दाखल करू अशी माहिती नातेवाईकांना दिली होती.
दरम्यान , राकेश यांच्या मृत्यू बाबत पोलिसांकडून तपास चालू असताना पोलिसांना तपासात एक धक्कादायक बाब उघडकीस आली. पत्नी आणि तिचा प्रियकर राकेश यांना मानसिक त्रास देत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने पती मानसिक तणावात गेला होता. पत्नी आणि तिचा प्रियकर सतत त्रास देत असल्याने पती राकेश उर्फ राधेशाम यांनी आत्महत्या केली आहे.
हेही वाचा : विवाहितेची दोन-दोन अफेअर्स, दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या बॉयफ्रेण्डचा काटा काढला
या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या पत्नी आणि प्रियकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
हेही वाचा : २० वर्षीय अभिनेत्री ट्युनिशा शर्माने आयुष्य संपवलं, मालिकेच्या सेटवरच टोकाचा निर्णय