भारतीय जनता पक्षाचे कार्यालयात डॉ. टोपले सभागृहात हा पक्ष प्रवेश समारंभ उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला. विजय मालोकार यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. मालोकारांच्या पुढच्या राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला असून उद्या त्यांचा प्रवेश सोहळा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. दरम्यान मालोकार आणि खासदार अरविंद सावंत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद असल्याचेही समजत आहे. त्या मतभेदतून मालोकार यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे.
घातपात नाही, ‘या’ कारणामुळे जयकुमार गोरेंचा अपघात, खासदार निंबाळकरांना खात्री
विजय मालोकार नेमके कोण आहेत?
विजय मालोकार हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकांपैकी एक आहेत. शिवसेनेत जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. सन १९९९ मध्ये मालोकार यांना तत्कालिन बोरगावमंजू मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यानंतरच्या दोन निवडणुकीत त्यांना पक्षानं डावलल्यामूळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यात २००४ मध्ये ४० हजार मते मिळत अल्पमतांनी पराभूत व्हावं लागलं होतं. तर २००९ मध्ये ‘जनसुराज्य पक्षा’चे उमेदवार म्हणून मालोकारांनी ३० हजार मते घेतली होती. मालोकार यांच्याकडे आज उत्कृष्ठ संघटक म्हणून पाहिले जाते. त्यांच्या राजीनाम्याने अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. विजय मालोकार ठाकरे गटाच्या राजीनाम्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नक्कीच शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाला अकोल्यात मोठा फटका बसणार आहे, अशा चर्चाही सर्वत्र होत आहेत.
हॉटेलमधून हाकलल्याने तुमचा अवमान, मला माफ करा; रितेश देशमुखने मागितली क्षमा
विजय मालोकारांची राजकीय कारकिर्द
अकोला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि शिवसेनेचे अकोला, यवतमाळ आणि वाशिमचे माजी सहसंपर्कप्रमुख म्हणून विजय मालोकार यांनी काम केलं. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचे संचालक देखील ते होते. १९९९ मध्ये बोरगावमंजू (आताचा अकोला पूर्व) मतदारसंघातून त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. २००४ मध्ये बोरगावमंजू मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अत्यल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना ४० हजारांवर मते मिळाली होती. २००९ च्या निवडणुकीत अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून ३० हजार मतं घेतली होती.
चंद्रपुरात राजकीय तमाशा; मंत्री मुनगंटीवारांना येण्यास उशीर ; खासदार संतापले आणि थेट…