अनैतिक संबंधातून मैत्रीणीला संपवले; पिंपरीत १४ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचं गूढ अखेर उकललं

पिंपरी: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मैत्रिणीचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपीला चौदा वर्षानंतर पकडण्यात यश आले आहे. भोसरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यापासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांना तो पोलिसांच्या जाळ्यात सापडलाच. अप्पा गोगाजी मोहिते ( वय ५०) असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News Today)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अप्पा गोगाजी मोहिते हा भोसरी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या प्रकाश चव्हाण गँगचा सक्रिय सदस्य आहे. भोसरी परिसरात रहात असताना एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. मात्र या संबंधात तिची मैत्रीण अडथळा ठरत होती. अखेर आरोपीने तिचे पिंपरी येथून अपहरण केले आणि तिच्याच घरात ठेवून तिची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर त्याच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो अनेक ठिकाणी नाव आणि पत्ता बदलून रहात होता. गेल्या १४ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच त्याचा कोणताही फोटो पोलिसांकडे नसल्याने जुन्या फोटोवरून त्याला ओळखणे अवघड होते.

वाचाः मला दारू पिण्यासाठी पैसे दे, पतीने केला हट्ट, पत्नीने नकार देताच पाजलं विषारी औषध

पोलिसांनी तपास वेगळ्या पद्धतीने करयचे ठरवले. त्यात १५ वर्षांपासूनचे सहआरोपी आणि चव्हाण गँगच्या माध्यमातून पोलिसांनी तपास करण्याचे ठरवले. तपास करत असताना तो खेड तालुक्यातील वाकी येथे राहत असल्याचे समोर आले. तर, चाकण एमआयडीसी येथे मजुरीचे काम करत असून लवकरच तो औरंगाबाद येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. माझ्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या मैत्रीचे अपहरण करून तिचा खून केल्याचे त्याने कबूल केले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

वाचाः महाराष्ट्रात करोनाच्या नव्या व्हेरियंटचा संसर्ग किती?; वैद्यकीय तज्ञांना दिलं दिलासादायक उत्तर

Source link

Pune crime newspune live newsPune newsपुणे आजच्या बातम्यापुणे ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment