या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सावरखेडा येथे सुधाकर ज्ञानेश्वर अंभोरे (२५) या तरुणाचा गावातीलच रामेश्वर मारोती हरण यांच्यासोबत कचरा टाकण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. यापूर्वी किरकोळ कारणावरून त्यांचा वाद सुरू होता. शनिवारी दिनांक २४ डिसेंबर रोजी दोघांमधील वाद उफाळून आला. या वादाचे पर्यावासान हाणामारी झाले.
क्लिक करा आणि वाचा- अहमदनगरमध्ये देवस्थानांच्या ठिकाणी मास्कसक्ती होणार, करोना प्रोटोकॉल लागू करणार : विखे पाटील
उपचारादरम्यान झाला मृत्यू
यामध्ये रामेश्वरने रागाच्या भरात सुधाकर यास चाकूने भोसकले. यामध्ये सुधाकर गंभीर जखमी झाला. त्यानंतर परिसरातील गावकऱ्यांनी वाद मिटवून गंभीर जखमी झालेल्या सुधाकर यास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
क्लिक करा आणि वाचा- कर नाही त्याला डर कशाला, चौकशीला सामोरे जायला का घाबरता?; रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, बासंबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार, उपनिरीक्षक सुरेश भोसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे यांच्या पथकाने तातडीने गावात भेट देऊन पाहणी केली.पोलिसांनी रामेश्वर यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची पोलिसांनी सांगितले. मयत सुधाकर याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू; चिमुकल्याला मांडीवर घेऊन नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन, रुग्णालयावर मोठा आरोप