सकाळपासून वायफळ बडबड करण्यापेक्षा संघटनेवर लक्ष द्या. वायफळ बोलण्यापेक्षा कार्यकर्ते जोडायला सुरुवात करा. त्यातून तुमचा फायदा होईल, असा टोलाही मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. सुषमा अंधारे यांना कुठलाही बेस नाहीये. त्या कुठे लोकप्रतिनिधी नाहीये. शिवसेनेने त्यांना काहीही बोलत राहा म्हणून पुढे करण्यात आले आहे. ज्यांचे काही स्टेटस नाही त्यांच्याबद्दल काय बोलावे, असे म्हणत महाजन यांनी सुषमा अंधारें यांच्यावर टीका केली. शिंदे गटातील चाळीस आमदार भाजपमध्ये घेऊन भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुणाला कळणारही नाही की देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदावर दावा करतील ते, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. या टीकेला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते.
बोलायला लावू नका, महाजनांचा खडसेंना इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरचे आरोप झाले ते फेक स्वरूपाचे आरोप आहेत. अशा फेक आरोपांवर कोणी राजीनामा देत नाही. एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला नव्हता. पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता, असे म्हणत गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे.
माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे जिल्हाधिकारी कार्यालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील भूखंडाच्या आरोपावरून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना उत्तर दिले. तुम्हाला राजीनामा द्यायला लावला. प्रकरणात नेमकं काय घडलं ते मला सर्व माहित आहे. बोलायला लावू नका, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना इशारा दिला आहे.
बँडवाला बनला सरपंच, संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा; स्वतःसह अख्खं पॅनलही आणलं निवडून