१५ मिनिटांत पॅराग्लायडिंगमध्ये माझा नंबर येईल, बहिणीला केलेला सूरजचा तो मेसेज ठरला अखेरचा

सातारा: हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे पॅराग्लायडिंग दरम्यान पडून साताऱ्याच्या एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. पॅराग्लायडिंग दरम्यान सिक्योरिटी बेल्ट सुटल्याने हा तरुण उंचावर खाली जमिनीवर कोसळला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. सूरज शाह असं या तरुणाचं नाव आहे, तो मुळचा साताऱ्याचा राहणारा आहे. त्याच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यातच पॅराग्लायडिंगपूर्वी सूरजने त्याच्या बहिणीला केलेला अखेरचा मेसेजही पुढे आला आहे.

‘१५ मिनिटांत पॅराग्लायडिंगमध्ये माझा नंबर येणार’, असा मेसेज त्याने त्याच्या बहिणीला पॅराग्लायडिंग करण्यापूर्वी केला होता. तेव्हा कदाचित त्याने कल्पनाही केली नसेल की हा त्याचा अखेरचा मेसेज ठरेल. सूरज हा कुल्लू येथे फिरायला गेला होता. यावेळी तो पॅराग्लायडिंग करायला गेला. त्यापूर्वी त्याने अत्यंत उत्साहात आपल्या बहिणीला मेसेज केला. मात्र, पुढील काहीच मिनिटांत हा शाह कुटुंबाने तरुण मुलगा गमावला. ही बातमी सूरजच्या घरी कळताच आई-वडील, बहिणीसह कुटुंबातील सर्वच सदस्यांनी एकच टोहो फोडला. सूरजच्या मृत्यूने शाह कुटुंबच नाही तर अख्खं सातारा हादरुन गेलं आहे.

सूरज हा साताऱ्यातील शिरवळातील प्लास्टिक व्यापारी संजय शाह यांचा मुलगा आहे. सूरज शाह हा हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे फिरायला गेला होता. तो कुल्लू जिल्ह्यातील डोभी परिसरात रविवारी पॅराग्लायडिंग करायला गेला होता. पॅराग्लायडिंग करताना तो पॅराग्लायडर सोबत त्याने हवेत झेप घेतली. मात्र, हवेतच असाताना अचानक त्याचा सुक्योरिटी बेल्ट तुटला आणि तो थेट हवेतून ५०० फूट दरीत कोसळला.

त्यानंतर, स्थानिक लोकांनी सूरज शाह आणि पायलटला तात्काळ कुल्लू येथील रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६ आणि ३०४ ए अंतर्गत पायलटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताला जबाबदार कोण हे तपासानंतरच कळेल’.

Source link

himachal pradeshhimachal pradesh tourist deathkullumaharashtra tourist death himachal pradeshparagliding accidentsatara man died in kullusuraj shahsuraj shah last messagesuraj shah message to sister
Comments (0)
Add Comment