जिद्द, चिकाटीचा विजय; मोलमजुरी करणारा हमाल आज सरपंचपदी; युवराज ठाकरेंचं यश

नंदुरबार : राजकारणात फक्त श्रीमंतांचे स्थान असतं, अशी सर्वसामान्यांचा समज आहे. राजकारणात येण्यासाठी खूप पैसा, तामझाम लागतो असं म्हटलं जातं पण याला अपवाद ठरलेत नवनियुक्त सरपंच युवराज ठाकरे. एका व्यापाऱ्याकडे हमालीचं काम करणाऱ्या या पठ्ठ्यानं सरपंचपद मिळवलंय. युवराज ठाकरे हे व्यापाराकडे हमाली काम करायचे त्यानंतर त्याच ठिकाणी मुनीम म्हणून त्यांनी कामाला सुरवात केली आणि हीच मेहनत त्यांच्या कामी आली.

युवराज ठाकरे अगोदर व्यापाऱ्याकडे हमाली काम करायचे त्यानंतर त्याच ठिकाणी मुनीम म्हणून कामाला सुरवात केली. पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड असलेल्या युवराज यांची गावातील विविध प्रश्नांवर काम करण्याची इच्छा पाहून युवकांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क झाला त्यांना साथ लाभली. गावातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली युवराज हे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ४०३८ पैकी २२०० मतं घेऊन ते गावाचे जनतेतून थेट लोकनियुक्त सरपंच झाले.

टीम इंडियासाठी २०२३ आहे खास! वनडे वर्ल्डकप आणि…, असे आहे वर्षभराचे वेळापत्रक

युवराज हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून ते हमाली काम करतात. मात्र, त्यांना समाजसेवा करण्याची मोठी आवड आहे. गावातील विविध आणि आपल्या भागातील विविध प्रश्नांवर ते नेहमीच तरूणांच्या सोबत जाऊन सोडविण्याचा प्रयत्न करतात. गावातील ग्रामविकास पॅनलने त्यांची ही खुबी लक्षात घेत त्यांना थेट सरपंच पदाची उमेदवारी देत विजयी करून दिले.

आजही युवराज ठाकरे हे झोपडीवजा छोट्या घरात राहतात आणि आपल्या मालकाकडे कामालाही जातात. त्यातूनच आपला उदरनिर्वाह चालवत असताना आता गावाच्या विकासाकडेही लक्ष देणार असल्याचे युवराज यांनी सांगितलं. राजकारणासाठी पैशांची गरज असते हा निव्वळ गैरसमज आहे. काहीतरी करण्याची नवी उमेद आणि जनसंपर्क असल्यास आजही पैशांशिवाय राजकारण होऊ शकते हे युवराज यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

बोम्मईंवर ठाकरी आसूड, चंद्रकांतदादांवर प्रहार, शिंदे-फडणवीसांना टोले; सीमाप्रश्नावर

Source link

mhasavad gram panchayat electionmhasavad sarpanch yuvraj thackeraynandurbar gram panchayat electionnandurbar local newsनंदुरबार ग्रामपंचायत निवडणूकनंदुरबार लोकल बातम्याम्हसावद ग्रामपंचायत निवडणूकम्हसावद सरपंच युवराज ठाकरे
Comments (0)
Add Comment