मुंबईत सुट्टी, घरी परतताना कंटेनरची धडक, अवघ्या तीन किमी अंतरावर मित्रांना मृत्यूने गाठलं

जळगाव : गॅसच्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने गाडीतून प्रवास करणारे दोघे जण ठार झाले, तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. मयतामध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल देविदास सौपुरे (वय ३३ वर्ष, रा. गोंधळवाडा, पारोळा ) आणि डॉ. निलेश भीमराव मंगळे (वय ३४ वर्ष रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा समावेश आहे. तर संदीप आनंदा पवार (वय ३५ वर्ष, रा, राणी लक्ष्मीबाई नगर, पारोळा) हे जखमी झाले आहेत.

पारोळा शहरातील कुणाल सौपुरे, डॉ. निलेश मंगळे व संदीप पवार हे तिघेही मित्र आहेत. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने कुणाल सौपुरे यांच्यासह त्यांचे दोघेही मित्र एम.एच.४३ ए.एल.४१७५ या क्रमांकाच्या कारने मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना पारोळ्यापासून काही अंतरावर विचखेडा गावाजवळ त्यांच्या कारला भरधाव असलेल्या एम एच ३१ एफसी 4393 या क्रमांकाच्या गॅस कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत कार चालक कुणाल सौपूरे व त्यांच्या शेजारी बसलेले डॉ निलेश मंगळे यांचा कारमध्ये दबल्या जाऊन जागेच मृत्यू झाला तर कारमध्ये मागच्या सीटवर बसलेले संदीप पवार हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर रस्ता लागत उभा करून चालक पसार झाला होता.

घटनेची माहिती मिळाल्यावर पारोळा शहरातील सुनील वसंत बारी मोतीलाल सुका बारी, महेंद्र छगन बारी, ज्ञानेश्वर त्रंबक बारी, सुरेश प्रकाश बारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. रुग्णवाहिकेने तिघांना पारोळा शहरातील कुटिर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुणाल सौपुरे व डॉक्टर निलेश मंगळे या दोघांना मयत घोषित केले. तर संदीप पवार यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघात प्रकरणी सुनील वसंत बारी यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालकविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : घटस्फोटानंतरही संशय कायम, शंकरने महिलेच्या डाव्या मांडीवर इंजेक्शन टोचलं, नंतर घडलं भयंकर

एकाच घटनेत दोन मित्रांचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने हळहळ

कुणाल सौपूरे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, व दोन वर्षाची लहान मुलगी आहे. ते पारोळा नगरपालिकेत अभियंता होते. त्यांचा सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव होता. डॉ निलेश मंगळे हे उत्तराखंड येथे एम एस ऑर्थो स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भावंडे, पत्नी व दोन महिन्याची जुळी मुलं आहेत. एकाच घटनेत दोन मित्रांचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने पारोळा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : बाईकला वाचवण्यासाठी ड्रायव्हरची शिकस्त, बस खड्ड्यात घातली, दाम्पत्य थोडक्यात बचावलं

Source link

car container accidentgas container hits carjalgaon car accidentjalgaon car accident friends deathmaharashtra accident news todayकार कंटेनर अपघातजळगाव कार अपघातजळगाव मित्र कार अपघातजळगाव मित्रांचा मृत्यू
Comments (0)
Add Comment