एकाच घरात दुसऱ्यांदा चोरी करणे महागात पडले; पोलिसांनी ‘असे’ पकडले, चोरीचे कारण ऐकून…

कल्याण : ज्या घरात पहिल्यांदा चोरी केली त्याच घरात चार महिन्यांनी पुन्हा चोरी केली आणि येथेच चोरटा फसला. कल्याण पश्चिमेतील मेमन मशीद परिसरात ही घटना घडली. बाजारपेठ पोलिसांनी रियाज शेख (३६) या चोरटयाला बेड्या ठोकल्या आहेत.

फारुख शेख (५५) हे कल्याण पश्चिम येथे मेमन मशीद परिसरात गुलजार टांगेवाली चाळ परिसरात राहतात. त्यांचे कल्याणमध्येच शोरूम आहे. त्यांच्या घरासमोरच आरोपी रियाज शेख हा राहण्यास आहे. तो रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. रियाज याची पत्नी गरोदर आहे. तसेच त्याची बहिण आजारी असते. यासाठी त्यांच्या उपचारासाठी रियाज शेखला लाखो रुपयांचा खर्च आला होता.

क्लिक करा आणि वाचा- शिक्षकाला स्टाफरूमधून विद्यार्थ्यांनी बाहेर बोलावले, गाडीजवळ येताच केले काळिमा फासणारे कृत्य

हा खर्च भरुन काढण्यासाठी रियाजने चोरीचा मार्ग पत्करला. ऑगस्ट महिन्यात फारुख शेख यांच्या घराचे कुलूप तोडत रियाजने घरातील ८ तोळे सोने व रोकड चोरली होती. त्यानंतर २० डिसेंबरला पहाटे फारुख हे त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने घराबाहेर गेले होते. याचा फायदा घेत रियाजने त्यांच्या घरातील १७ लाख रुपयांची रोकड चोरली.

याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच घरात दोनदा चोरी झाल्याने पथकाने तपासाला सुरुवात केली. शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीचे हे काम असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. त्यानुसार माहिती काढली असता गुप्त बातमीदाराने एक व्यक्ती फारुख यांच्या घरी गेल्याचे सांगितले. त्यानुसार तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी रियाजला ताब्यात घेतले.

क्लिक करा आणि वाचा- उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर बसलेले; चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका

पोलिसी खाक्या दाखवताच चोरट्याने दिली कबुली

रियाज याची पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला त्याने आपण रिक्षा चालवत असून त्यावेळी त्या परिसरात नसल्याचे सांगितले. परंत, पोलिसांनी पोलिस खाक्या दाखवताच रियाजने चोरीची कबुली दिली. याबरोबर त्याने बारदान गल्ली परिसरात देखील चोरी केल्याची कबुली दिली. येथून त्याने १ तोळे सोने व ४० हजाराची रोख रक्कम चोरली होती.

क्लिक करा आणि वाचा- जेव्हा घरात चोर न शिरताच होते चोरी… पोलिसही चक्रावले, मात्र संशयावरून सापडले धागेदोरे

पोलिसांनी आरोपी रियाज याच्याकडून ५ हजाराची रोख रक्कम व ९ तोळे सोने असा एकूण २ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रियाज हा सध्या पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Source link

kalyan crimetheftTheft in Kalyanकल्याणचोरीपोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या
Comments (0)
Add Comment