जनावराच्या हल्ल्यात मृत्यूचा भास, अत्याचाराच्या प्रयत्नानंतर चिमुरडीचा जीव घेतल्याचं उघड

रायगड : रायगड जिल्ह्यात कारगाव येथील जंगलात आठ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिची हत्या करणारा अजय विजय चव्हाण (वय २० वर्ष, रा. कारगाव, ता. खालापूर) याला रायगड पोलीस पथकाने अटक केली आहे. पीडिता एकटीच जात असल्याची संधी साधून लैंगिक इच्छा भागविण्यासाठी त्याने तिचा पाठलाग केला. त्यानंतर बळजबरीचा प्रयत्न केल्याचे आरोपी अजयने कबूल केले

खोपोली-पाली राज्यमार्गावर असलेल्या कारगाव येथील जंगलात १८ डिसेंबरला अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर हिंस्र श्वापदाने हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबून खून झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलीस गावातील जवळपास पन्नास संशयितांची यादी तयार केली.

पोलीस निरीक्षक दर्जाचे वीसपेक्षा जास्त अधिकारी आणि शंभर पोलीस अंमलदार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार तपास कामात गुंतले होते. जंगल भाग आणि त्या भागात क्रिकेट स्पर्धा असल्याने आरोपीचा सुगावा लागेल असे काही हाती लागले नव्हते.

रायगड पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे खालापूरला तळ ठोकून होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि पथकाने पीडित अल्पवयीन मुलीला जंगलात जाताना शेवटचे पाहिलेल्या संशयित अजय चव्हाणकडे चौकशी केली असता तो घाबरलेला तसेच दरवेळी वेगळी माहिती देवू लागल्याने पोलीसांचा संशय बळावला.

अखेर संशयित अजयला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पीडित एकटीच जात असल्याने लैंगिक इच्छा भागविण्यासाठी तिचा पाठलाग करुन बळजबरीचा प्रयत्न केल्याचे आरोपी अजयने कबूल केले. बळजबरीचा प्रयत्न फसल्यामुळे पीडित मुलगी घरी नाव सांगेल, या भीतीने अजयने तिचा गळा दाबून तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.

मृत आठ वर्षीय आराध्याच्या वडिलांचा वडापाव विक्रीचा धंदा कारगाव येथे आहे. रविवारी १८ डिसेंबर रोजी पाटलांचा माळ येथे क्रिकेट स्पर्धा असल्याने त्याठिकाणी आराध्याच्या वडिलांनी वडापावची गाडी लावली होती.

वडिलांना मदत करण्यासाठी पाटलाचा माळ येथे दुपारी ती एकटी निघाली. त्यानंतर आराध्या टॉवर जवळील जंगलात मृत अवस्थेत आढळून आली होती. डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्याने हिंस्त्र श्वापदाने हल्ला केल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली होती. आराध्याच्या मृत्यूबाबत गूढ वाढल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात आला होता.

शवविच्छेदन केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत हिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचा अहवाल दिला. यामुळे आराध्याचा खून झाला असल्याचा निष्कर्ष निघाल्यावर अज्ञात इसमांविरुध्द भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. संशयित आरोपी अजय विजय चव्हाण (वय २०, रा. कारगाव, ता. खालापूर) याला रायगड पोलीस पथकाने अटक केली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठे ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या संवेदनशील प्रकरणाचा तपास खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड दयानंद गावडे, रोहा पोलीस निरीक्षक किरण सूर्यवंशी, खोपोलीचे शिरीष पवार, पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे रसायनी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, नेरळ पोलीस निरीक्षक तेंडुलकर, सपोनी गणेश कराड, सपोनी जी बिबालवाडकर, अजित साबळे, महिला सपोनी तृप्ती बोराटे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आरोटे, महिला पोलीस उपनिरीक्षक सरला काळे, खालापूर पोलीस ठाणे हवालदार निलेश सोनवणे, तुषार सुतार, नितीन शेडगे, हेमंत कोकाटे, सचिन वस्कोटी, सहाय्यक फौजदार गणेश गिरी, पोलीस हवालदार प्रतीक सावंत, सुधीर मोरे, राकेश म्हात्रे तसेच सायबर पथकाने प्रचंड मेहनत करून या गुन्ह्याची उकल केली. या सर्व पथकाला कौशल्यपूर्ण तपासामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ३५ हजारांचे रिवार्ड जाहीर केले.

हेही वाचा : मित्रासोबत जाताना बाईकवरुन पडली, २२ वर्षीय युवतीचा मृत्यू, तरुणाला अटक
कारगाव जंगल भागात मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर सुरुवातीपासून पोलिसांच्या मदतीला अपघातग्रस्त मदत पथक प्रमुख गुरुनाथ साठेलकर आणि पथक होते. घटनास्थळी पुरावा शोधण्यासाठी गवत कापणी करण्यात अपघातग्रस्त मदत पथकाने मोलाची भूमिका बजावली. अपघातग्रस्त मदत पथकाला देखील २५ हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

हेही वाचा : मुंबईत सुट्टी, घरी परतताना कंटेनरची धडक, अवघ्या तीन किमी अंतरावर मित्रांना मृत्यूने गाठलं

Source link

animal attackattempt to rapemaharashtra crime newsraigad crimeraigad khalapur kargaon murderraigad murderraigad small girl murderअत्याचाराचा प्रयत्न करुन हत्यारायगड चिमुकली हत्यारायगड चिमुरडी खून
Comments (0)
Add Comment