साताऱ्यातील दुचाकीस्वाराचा रत्नागिरीत अपघाती मृत्यू, सुट्टी संपवून कामावर जात असताना काळाने गाठले

रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणाजवळ टँकर-मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. लालासो खाशाबा शेवाळे असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

रत्नागिरी येथे कामाला असलेले लालासो खाशाबा शेवाळे (५८) हे रत्नागिरीच्या दिशेने येत होते. रत्नागिरी येथे कामाला असलेले शेवाळे सुट्टी संपवून हजर होण्यासाठी आपल्या ऑफिसकडे येत होते. याचवेळी एका वळणावर घात झाला आणि एका क्षणात सगळेच होत्याच नव्हतं झालं. ते शासकीय सेवेत कामाला होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. शेवाळे हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवडे येथील रहिवासी आहेत.

क्लिक करा आणि वाचा- देवदर्शनाहून परतताना रात्र झाली, रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून झोपले, इतक्यात घडले धक्कादायक

या मार्गावरील टँकर रत्नागिरी ते कोल्हापूरच्या दिशेने जात होता. तर मोटारसायकलस्वार कोल्हापूर ते रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत होते. याचवेळी साखरपा जवळील आंबा घाटातील चक्री वळणाजवळ दोन्ही वाहने आली असता मोटारसायकल टँकरवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेने अपघातग्रस्ताला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने आणण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- एकाच घरात दुसऱ्यांदा चोरी करणे महागात पडले; पोलिसांनी ‘असे’ पकडले, चोरीचे कारण ऐकून…

अपघाताचे वृत्त कळताच साखरपा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक विद्या पाटील, हवालदार किरण देसाई, सागर उगले हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्ताला आरोग्य केंद्रात दाखल करून पुढील सोपस्कार पूर्ण करून मृतदेह ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शवविच्छेदन केल्यावर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- शिक्षकाला स्टाफरूमधून विद्यार्थ्यांनी बाहेर बोलावले, गाडीजवळ येताच केले काळिमा फासणारे कृत्य

Source link

A bike rider lost his life in an accidentamba ghatan accidentआंबा घाटात अपघातटँकरची दुचाकीस्वारास धडक
Comments (0)
Add Comment