पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केलेल्या नव्या खुलासाने फोन टॅपिंग प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. शुक्ला यांनी फोन टॅपिंग आम्हाला फोन टॅपिंग करायला लावले होते असे डहाणे यांनी चौकशीच्या वेळी सांगितले आहे. हे फोन टॅपिंग मार्च २०१६ ते जुलै २०१८ या काळात करण्यात आले होते.
वाचा- IND vs SL: हे तर ठरलेच होते…एकाचे आंतरराष्ट्रीय संपल्यात जमा तर दुसऱ्याला बेजबाबदारपणाची…
दरम्यान, फोन टॅपिंगची पुन्हा नव्याने चौकशी करण्यात यावी, असे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. पुणे पोलिसांनी यासंदर्बात क्लोजर रिपोर्ट पाठवला होता. मात्र तपासाची कागदपत्रे पुन्हा अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार आरोप केले होते. राज्यात नवे सरकार आल्यानंतर शुक्ला यांना कशी काय क्लिनचिट मिळाली असा प्रश्न उपस्थित होत होता. आता या संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिल्याने नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.
वाचा- कोंबडीचे पाय का तोडले म्हणून धारदार शास्त्राने वार; मटण शॉपमधील घटनेची संपूर्ण तालुक्यात…
काय म्हटले होते पुणे पोलिसांनी
पुणे पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये शुक्ला यांनी फोन टॅपिंग कसे केले, कोणा कोणाचे केले याचा तपशील दिला होता. त्याच बरोबर त्यांनी हे देखील सांगितले की शुक्ला यांनी फोन टॅपिंगमधील माहिती कुठे लिक केली नाही. म्हणून आम्ही क्लोजर रिपोर्ट सादर करत आहोत. मात्र न्यायालयाने ही गोष्ट फेटाळून लावली. शुक्ला यांनी या सर्व गोष्टी केल्या असतील आणि त्या लिक केल्या नाहीत म्हणून तपास होणार नाही, हे चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले.