पेढे भरवले, संविधान उंचावलं, अनिल देशमुखांचा बाहेर येताच परमबीर सिंहांवर हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून जामिनावर बाहेर आले आहेत. अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनिल देशमुखांवर फुलांचा वर्षाव केला. अनिल देशमुखांनी जेलबाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पेढे भरवले. यावेळी त्यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझेंवर हल्लाबोल केला.

अनिल देशमुख काय म्हणाले?

मला खोट्या आरोपामध्ये फसवण्यात आलेलं आहे. परमबीर सिंह यांनी माझ्यावर १०० कोटींचा आरोप लावला होता. त्याच परमबीर सिंह यांनी न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या समोर जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं. जे आरोप लावलेले आहेत ते केवळ ऐकीव माहितीवर लावलेले आहेत, त्याचे कसलेही पुरावे नाहीत, असं सांगितलं. परमबीर सिंह यांच्या जवळचे अधिकारी सचिन वाझे यांनी माझ्यावर आरोप केले होते. सचिन वाझेवर गंभीर आरोप आहेत, त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. दोन गुन्ह्याचा आरोप आहे, तीनदा निलंबित करण्यात आलेलं होतं. मुंबईच्या उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीच्या जबाबावर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं.आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे,न्यायमूर्तींनी न्याय दिला याबद्दल सर्वांचे आभार मानतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे आणि पक्षाचे नेते यांचे आभार मानतो, असं अनिल देशमुख म्हणाले. अनिले देशमुख यांनी भारतीय संविधानाचं पुस्तक उंचावलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

पुतीन यांनी आता भारतात घुसून विरोधकाचा काटा काढला; युक्रेन युद्धापासूनची ही १०वी घटना

अजित पवार काय म्हणाले?

आज आम्हाला सगळ्यांना आनंद झालेला आहे. आमचे एक सहकारी तुरुंगात होते. आता बाहेर आल्यानंतर कोर्टानं आदेश दिला आहे ते सर्वजण पाहतील. लोकशाही असो की संविधान असो, आरोप झाल्यानंतर कोर्टात दाद मागितली जाते. अनिल देशमुख आज बाहेर आलेले आहेत, असं अजित पवार म्हणाले.

करोना लसीचे तीन डोस घेतलेत..? मग विमा कंपन्यांकडून मिळेल मोठी सूट, वाचा सविस्तर तपशील

पुरावा नसताना दीड वर्ष तुरुंगात ठेवलं होतं. संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. विनाकारण तुरुंगात ठेवलं जातं. मला देखील अडीच वर्ष तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. संपूर्ण देशानं यावर फेरविचार करावा, असं छगन भुजबळ म्हणाले.

कोविडचे निर्बंध कमी केल्यानंतर आता चीनचा आणखी एक मोठा निर्णय, जगावर काय परिणाम होणार?

Source link

ajit pawaranil deshmukhAnil Deshmukh attack on Parambir singhanil deshmukh bailAnil Deshmukh Newsanil deshmukh news todayanil deshmukh releasedmaharashtra winter session 2022Mumbai Policencp news
Comments (0)
Add Comment